रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी'मराठीतील बिगेस्ट एडव्हान्स ओपनिंग सिनेमा, एक लाख तिकीटांची आगाऊ विक्री
Tv9 Marathi May 01, 2026 12:45 AM

अभिनेता रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग करण्यासाठी तयार आहे. ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वात मोठी ओपनिंग म्हटली जात आहे.

रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या प्रोडक्शन हाऊसने मुंबई फिल्म कंपनीमार्फत मराठीत तीन चित्रपट तयार केले आहेत. राजा शिवाजी हा या कंपनीचा चौथा चित्रपट आहे.या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजाचे प्रमुख कॅरेक्टर साकारत आहे. विजापूरच्या सुल्तान अफजल खान यांच्या रोलमध्ये संजय दत्त त्याच्या समोर आहे. राजा शिवाजी चित्रपटात अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान आणि बोमन इराणी यांच्या सारखे नामी गिरामी अभिनेते यात आहेत. तर सलमान खान यात कॅमिओ करत आहे.

पॅन इंडिया चित्रपटासारखा ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला रिलीज केले जात आहे, राजा शिवाजी हिंदी आणि मराठीत रिलीजसाठी तयार आहे. १०० कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेला राजा शिवाजी महागडा मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र, या चित्रपटाला मिळालेली एडव्हान्स बुकींग सांगते की हा चित्रपट केवळ बजेट रिकव्हर करणार नाही, तर सर्वात मोठी हिट बनण्याच्या तयारीत आहे.

राजा शिवाजीची एडव्हान्स बुकिंग

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार गुरुवारी दुपारपर्यंत राजा शिवाजीसाठी सुमारे ९९ हजार तिकीटांची आगाऊ बुकींग झाली आहे. यामुळे बुकींगमुळे राजा शिवाजीला एडव्हान्समध्येच २.५ कोटींहून अधिक ग्रॉस कलेक्शन मिळाले आहे. ब्लॉक सीट्ससोबत हा आकडा ४ कोटींच्या अत्यंत जवळ आहे.

तिकीट बुकींग प्लॅटफॉर्म बुक माय शोवर राजा शिवाजीची सुमारे ४ हजार तिकीटे दर तासाला बुक होत आहेत. त्यामुळे रात्रीपर्यंत एकूण आगाऊ बुकींग तिकीटांचा आकडा एक लाखाच्याही पुढे जाईल. आणि राजा शिवाजीची एडव्हान्स बुकींग ग्रॉस, विना ब्लॉक सीट्सचे कलेक्शन तीन कोटी पुढे जाईल असे म्हटले जात आहे.

मराठी सिनेमातील सर्वात मोठी एडव्हान्स बुकींग

राजा शिवाजीच्या एडव्हान्स बुकींगवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की याची ओपनिंग ८ कोटींच्या आसपास आरामात जाऊ शकते. याआधी कोणत्याही मराठी चित्रपटाला ५ कोटी नेट ओपनिंग मिळालेली नाही. सैराट आणि टाईमपास या चित्रपटाला २ आणि ३.६० कोटींची आतापर्यंत सर्वात मोछी ओपनिंग मिळालेली आहे.

राजा शिवाजी जरी अंदाजापेक्षा थोडी कमजोर जरी ओपनिंग मिळाली तरी हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीतील सर्वात मोठा ओपनिंगचा रेकॉर्ड सहज बनवेल. जर या चित्रपटाचा जनतेचा वर्ड ऑफ माऊथ जर पॉझिटीव्ह राहिला आणि प्रेक्षकांचा मराठा इतिहासाशी संबंधित पीरिएड ड्रामा पाहण्याच्या फिलिंगने उसळी खाल्ली तर राजा शिवाजी १० कोटींचा आकडा देखील पार करु शकते. आता मे महिन्याची सुरुवात मराठी सिनेमासाठी कशी राहते ? कोणता नवा लँडमार्क घेऊन येते हे काळच ठरवेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.