हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या, शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांची गोष्ट रुपेरी पडद्यावर ! 'शहाजीराजे' सिनेमाचं पोस्टर रिलीज
esakal April 30, 2026 10:45 PM

Marathi Entertainment News : महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ चित्रपट जागतिक स्तरावर झेप घेत असतानाच आता ते प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य ऐतिहासिक पर्व घेऊन येत आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘शहाजीराजे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

पोस्टरमध्ये शहाजीराजांचा भव्य, गंभीर आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत असून, त्यातून चित्रपटाच्या दिमाखदार मांडणीची झलक दिसते. पोस्टरमध्ये चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीची तीव्रता आणि संघर्षाची जाणीव अधिक ठळकपणे करून देतो. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असून पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे.

संस्कृती आणि इतिहासाशी घट्ट नातं जपणाऱ्या विषयांवर काम करण्यासाठी ओळखले जाणारे संतोष डावखर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तृत्व, शौर्य आणि विचारांचा ठसा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shahaji Raje - The Rise of Maratha Warrior (@shahajirajefilm)