Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जातायेत का? या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला काय फरक पडतो? ते जवळ गेले तर भाजपने त्यांना जवळ घ्यायला तर पाहिजे असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला, एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात तुम्ही वाढू नये असा भाजपकडून प्रयत्न होतोय का? असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. यावेळी एकनाथ सिंदे म्हणाले की, महायुतीची सगळीकडे विजयी घोडदौड सुरु आहे. कुठे ना कुठे काही ना काही होतं. पॉझिटिव्हली काम करण्यावर माझा भर असतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जगातला सगळ्यात वाईडेस्ट टनेल म्हणजे अभियांत्रिकीचा चमत्कार असलेल्या मिसिंग लिंकचं उद्या आम्ही उद्धाटन करणार आहोत. इंधन , वेळ, अपघात वाचणार आहेत. घाटातील प्रवास टनेलमधून करणार आहोत. फार टफ आणि आव्हानात्मक हा प्रकल्प असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कोस्टल रोड , बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला. अनेक प्रकल्प हाती घेतलेत. नवी मुंबईत विमानतळ केलंय दीड तासाऐवजी 20 मिनिटात सध्या प्रवास होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तिसरी मुंबई तयार होतेय , मोठ्या शिक्षणसंस्था, आरोग्य संस्था तिथे होतायत. वाढवणमध्ये जो पोर्ट होतोय तो नंबर एकचा पोर्ट होतोय. आता बांद्रा वर्सोवा लिंकही करतोय. मुंबई वडोदराला कनेक्ट करतोय वाढवणपर्यंत. मुंबई -गोवा ग्रीन फिल्ड रस्ता करत आहोत. अलिबाग ते थेट पत्रादेवीपर्यंत जसं मुंबईत कोस्टल, अटल सेतू तसं मेट्रोचं उद्धाटन करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेबांनी म्हटलं होतं की 40 लाख लोकांना घरं द्या. रमाबाई आंबेडकरनगर क्लस्टर सुरू झालं आहे. म्हाडा एसआरएच्या माध्यमातून न्यू हाऊसिंग पॉलिसीमध्ये सिडको, एमएमआरडीए, असे अनेक प्रकल्प एकत्र केलेत. अदानीला जागा दिली असं सुरू आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं सगळ्यांना घर द्या. 25-50 जागांचं एकत्र क्लस्टर केलं पाहिजे. लाडक्या बहिणीसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठीही आम्ही तरतूद केली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. कुठलंही काम आव्हान म्हणून घ्यायचं असतं. खड्ड्यात गेलेलं खातं मला दिलं होतं मी स्विकारलं. बऱ्याच जणांनी समृद्धीला विरोध केला होता.जिथे आंदोलन झालं तिथेच मी गेलो त्यांना समजावल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
ट्रॅफिक आणि पर्यावरणाच्या मुद्यावरुन आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी टीका करत नाही पण मुंबईत रोज पावसाळ्यात खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा काय केलं तर खड्डेमुक्त करण्यासाठी कॉंक्रिटीकरण करायला हवी हे कळलं. त्यासाठी दोन फेजेसमध्ये काम करायचं ठरलं एक फेज पूर्ण झाली दुसरंही संपण्याच्या टप्प्यात आहे. आमचं डेव्हलपमेंट प्रो एनव्हायरमेंट आहे. आम्ही फ्लेमिंगो कमी नाही झाले उलट ते वाढल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
बांद्रा -वर्सोवा मार्ग होत आहे. एलिवेटेड रोड करतोय , दोन तासाचं अंतर 20 मिनिटात होईल. ईस्टर्न, वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल. पॉड टॅक्सीचं भूमिपूजन केलं आहे. मुंबई हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या उमेदवारीसंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणाला बाहेर ठेवायचं आणि आत ठेवायचं यात आमचं काम नाही. आम्ही ठरवून काही केलेलं नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. मी करतो ते मोकळे पणाने, लपून छपून काही करत नाही. कार्यकर्त्यांनी सांगितलं आमच्यासोबत या प्रत्येकाच्या कपाळावर कॅरेक्टर सर्टिफिकेट लिहिलेलं नसतं असं ते म्हणाले.