महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृह विभागाचा मोठा निर्णय
राजू सोनावणे April 30, 2026 11:13 PM

अ.क्र. पोलीस अधिकाऱ्याचे नाव विद्यमान पदस्थापना बदलीनंतरची पदस्थापना
1 अजय के. बन्सल पोलीस अधीक्षक, जालना पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य
2 सिंगुरी विशाल आनंद पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, धुळे
3 बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
4 सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर सहायक पोलीस महानिरीक्षक (नि. व स.), पोलीस महासंचालक कार्यालय
5 रविंद्रसिंह एस. परदेशी पोलीस अधीक्षक, परभणी उप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई.
6 संदीप घुगे उप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई. पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
7 श्रवण दत्त पोलीस अधीक्षक, नंदुरबार अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर
8 मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, चंद्रपुर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
9 धोडोंपत एस. स्वामी पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)
10 अनुज मिलिंद तारे पोलीस अधीक्षक, वाशिम पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
11 अनुराग जैन पोलीस अधीक्षक, नगरी हक्क संरक्षण पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
12 अश्विनी सानप पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक, नंदुरबार
13 तेगबीर सिंह संधु अपर पोलीस अधीक्षक, मालेंगाव पोलीस अधीक्षक, जालना
14 राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे शहर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे
15 निकेश खाटमोडे पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे पोलीस अधीक्षक, वाशिम
16 आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक, जालना पोलीस अधीक्षक, चंद्रपुर
17 पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, परभणी
18 निकेतन कदम पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, नागपुर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)
19 सुरज गुंजाल अपर पोलीस अधीक्षक, परभणी अपर पोलीस अधीक्षक, मालेंगाव
20 गजानन राजमाने पोलीस अधीक्षक, फोर्स वन पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
21 दत्ता लक्ष्मण तोटेवाड अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसर अपर पोलीस अधीक्षक, अमरावती

आयुष नोपानी चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक, असतील. सध्या ते जालना येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.  विद्यमान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे पोलीस अधिक्षक पदावर बदली झाली आहे. आयुष नोपाणी यांनी याआधी चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) म्हणून केलं काम आहे. 

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. डी एस स्वामी यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यावर मुंबई पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

नितेश खाटमोडे वाशिमचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. या पूर्वी 16 एप्रिल रोजी राजेंद्र शिंदे यांचे वाशिमचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नाव जाहीर झालं होतं. मात्र आता नवीन नाव आल्याने जिल्ह्यात चर्चेला विषय मिळाला आहे. 

 
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी विशाल आनंद शिंगूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेल्या विशाल आनंद यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. तब्बल दहा ते बारा दिवसानंतर धुळे जिल्ह्याला पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. 
 
परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची बदली झाली असून ते आता  उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई म्हणून काम पाहतील. अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत परभणीचे नवीन पोलीस अधीक्षक असतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.