GT vs RCB : गुजरातचा 4 विकेट्सने विजय, आरसीबीचा हिशोब चुकता
Tv9 Marathi May 01, 2026 06:45 AM

गुजरात टायटन्स टीमने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 42 व्या सामन्यात शुबमन गिल याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातने हे आव्हान 25 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 15.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. गुजरातने या विजयासह आरसीबी विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड केली.आरसीबीने 24 एप्रिलला गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र गुजरातने आठवड्याभरातच आरसीबीचा हिशोब चुकता केला. गुजरातचा हा या मोसमातील एकूण पाचवा विजय ठरला. गुजरात 5 सामने जिंकणारी एकूण पाचवी टीम ठरली आहे. तर आरसीबीला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सामन्यात काय घडलं?

गुजरातने टॉस जिंकून आरसीबी टीमला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. आरसीबीला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने आरसीबीला 19.2 ओव्हरमध्ये 155 रन्सवर ऑलआऊट केलं. आरसीबीसाठी देवदत्त पडीक्कल याने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर विराट कोहली याने 28 धावांचं योगदान दिलं. तसेच कॅप्टन रजत पाटीदार याने 19, रोमरिया शेफर्ड याने 17 आणि वेंकटेश अय्यर याने 12 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी भुवनेश्वर कुमार याने 15 धावा जोडल्या.

गुजरातकडून अर्शद खान याने आरसीबीच्या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जेसन होल्डर आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा हे दोघे प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यशस्वी ठरले.

स्कोअरकार्ड

गुजरातचा विजयी पंच

गुजरातकडून 156 धावा करण्यासाठी एकूण 6 फलंदाजांना बॅटिंग करावी लागली. साई सुदर्शन याने 6 तर शाहरुख खान याने 8 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा जोडल्या. जोस बटलर याने 19 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. तसेच कॅप्टन शुबमन गिल याने 18 बॉलमध्ये 238.89 च्या स्ट्राईक रेटने 43 रन्स केल्या.

राहुल तेवतिया आणि राशीद खान या दोघांनी गुजरातला विजयी केलं. राशीदने नाबाद 7 धावा जोडल्या. तर तेवतियाने 17 बॉलमध्ये नॉट आऊट 27 रन्स केल्या. तेवतियाने या दरम्यान 4 षटकार लगावले. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार याने 3 विकेट्स मिळवल्या. रोमरिया शेफर्ड याने दोघांना बाद केलं. तर सूयश शर्मा याने 1 विकेट मिळवली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.