IPL 2026: दिल्ली राजस्थान सामन्यात या दिग्गज खेळाडूला खेळता येणार नाही, कारण की..
GH News May 01, 2026 06:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी चुरशीची झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचा निकाल आता महत्त्वाचा असणार आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेतील हा 43वा सामना असून दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ अवघ्य 75 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सला राजस्थानविरुद्धची लढत वाटते तितकी सोपी नाही. कारण राजस्थान रॉयल्स संघ जबरदस्त फॉर्मात आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन वाढलं आहे. कारण या सामन्यात स्टार खेळाडूला खेळण्याची संधी मिळणार नाही. फिट अँड फाईन असूनही खेळण्याची संधी मिळणार नसल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएलच्या एका नियमामुळे त्याला मैदानात उतरता येणार नाही.

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी डोक्याला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला आहे. त्याने नेटमध्ये सरावही सुरू केला आहे. पण आयसीसीच्या कन्कशन संबंधित नियमामुळे राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात खेळता येणार नाही. लुंगी एन्गिडीला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. 25 एप्रिलला झालेल्या सामन्यात झेल पकडताना डोक्यावर आदळला होता. त्यामुळे त्याला मैदानात रुग्णवाहिका आणून न्यावं लागलं. लुंगी एन्गिडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणून विपराज निगमने जागा घेतली होती. आता त्याच्या दुखापतीत सुधारणा झाला आणि त्याला डिस्चार्ज दिला गेला.

आयसीसी नियमानुसार, कन्कशनमुले सामन्याला मुकलेल्या खेळाडूला कमीत कमी 7 दिवस सामना खेळता येत नाही. हा नियम आयपीएलमध्येही लागू आहे. 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान सात दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. राजस्थान विरुद्ध सामना असलेला दिवस सातवा आहे. लुंगी एन्गिडी मागच्या सामन्यातही भाग घेऊ शकला नव्हता. या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला होता. या सामन्यात त्याची उणीव ऑस्ट्रेलियाचा वेगवान मिचेल स्टार्क भरून काढू शकतो. स्टार्क अद्याप एकही सामना खेळलेला नाही. आता स्टार्क पूर्णपणे फिट असून राजस्थान विरूद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.