मुंबई : महापालिकेच्या वतीने अमर महल ते वडाळा, परळ आणि ट्रॉम्बे ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवार (ता. ५ मे) सकाळी १० वाजल्यापासून बुधवार (ता. ६ मे) दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ३० तास मुंबईतील शहर आणि उपनगरातील सहा विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अमर महल (हेडगेवार उद्यान) ते परळ आणि ट्रॉम्बे ते तुर्भे यादरम्यानचा जलबोगदा जोडण्याचे काम केले जाणार आहे. याअंतर्गत १,८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर पूरक कामे पूर्ण केली जातील. कामाच्या कालावधीत तुर्भे उच्चस्तरीय जलाशयाची १,८०० मिमी आणि निम्नस्तरीय जलाशयाची १,२०० मिमी जलवाहिनी तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे.
Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझरनागरिकांनी पाणीकपातीच्याकालावधीपूर्वीच पुरेसा साठा करून ठेवावा. कपातीच्या काळात पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून सहकार्य करावे. कामाची व्याप्ती मोठी असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
बाधित होणारे विभाग व परिसरखालील विभागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद किंवा कमी दाबाने होणार आहे.
शहर विभाग : एफ उत्तर (वडाळा, प्रतीक्षा नगर, शीव) आणि एफ दक्षिण (परळ, डॉ. आंबेडकर मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग परिसर)
पूर्व उपनगरे : एल विभाग (कुर्ला, टिळक नगर), एम पूर्व (मानखुर्द, शिवाजीनगर, देवनार, वाशी नाका), एम पश्चिम (चेंबूर, चेंबूर कॅम्प, माहुल गाव) आणि एन विभाग (घाटकोपर पूर्व व पश्चिम, विद्याविहार).
एफ उत्तर व दक्षिण : ६ मे रोजी प्रतीक्षा नगर, वडाळा आणि परळच्या अनेक मार्गांवर पाणीपुरवठा बंद राहील.
एल विभाग : ५ मे रोजी नेहरू नगर, कुर्ला पूर्व भागात पाणी नसेल, तर ६ मे रोजी साबळे नगरमध्ये पाणीकपात असेल.
एम पूर्व व पश्चिम : ५ मे रोजी देवनार, चिता कॅम्प आणि ६ मे रोजी चेंबूरच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने होईल.
एन विभाग : संपूर्ण घाटकोपर पूर्व आणि पश्चिम भागात ५ व ६ मे दोन्ही दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.