हे झाड म्हणजे सापांचा काळच; भीतीने चळाचळा कापतो, आयुष्यात पुन्हा कधी साप दिसणार नाही
Tv9 Marathi May 01, 2026 09:45 PM

अनेकांना बाग काम करण्याची आवड असते, आपण बागेत विविध प्रकारची झाडं, वेली लावतो. ज्यामध्ये काही झाडं ही सुंदर फुलांची असतात, काही झाडं ही फळांची असतात तर काही झाडं ही शोभेची असतात. मात्र बागेत झाडं लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. बागेत जास्त गवत वाढू देऊ नये. जर बागेत गवत वाढलं तर त्यामुळे बागेत साप येऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बागेत साप घुसण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये जमीन तापलेली असते, सापांना उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी साप नेहमी थंड जागेचा शोध घेत असतात. तुम्ही जेव्हा तुमच्या बागेला पाणी देतात, तेव्हा तेथील जमीन ओली असते, त्यामुळे साप बागेत शिरतात आणि अशा ठिकाणी जाऊन बसतात जिथे ते आपल्याला दिसत देखील नाहीत. त्यामुळे बाग नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बागेला जास्त पाणी देणं टाळलं पाहिजे, शक्यतो थिबक सिंचन पद्धतीने झाडांना पाणी द्यावं. मात्र तरी देखील साप थंड जागा असल्यानं तुमच्या बागेतील झाडांच्या पायथ्याशी आश्रय घेऊन बसू शकतात, अशावेळी सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. तसेच अशी देखील काही झाडं असतात जी सापांना त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे अशी झाडं बागेत लावताना विशेष काळजी घेणं गरजेचं असंत .

परंतु अशी देखील काही झाडं असतात, जी झाडं जर तुम्ही तुमच्या बागेत किंवा घरात लावले तर त्यामुळे तुमच्या घरात, बागेत साप प्रवेश करत नाहीत. सापांना दूर ठेवण्याचं काम ही झाडं करतात. हे झाड म्हणजे सर्पगंधाचं झाड आहे. सर्पगंधाच्या झाडामुळे साप त्या परिसरात येत नाही,  हे झाड जर तुम्ही तुमच्या बागेत किंवा घरात लावलं तर त्यामुळे साप तिथे येणार नाही, आणि सापांपासून तुमचं संरक्षण होईल.  मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर कुठेही साप दिसला तर त्याला पकडू किंवा मारू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापाला रेक्स्यू करतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.