भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने सीएनजी ( CNG ) कारचा दबदबा वेगाने वाढत आहे. मोठ्या संख्येने आता लोक सीएनजी कार खरेदी करत आहेत. मात्र, सीएनजी कारमध्ये जास्त ब्रँडचे ऑप्शन मिळत नाहीत. त्यामुळे आता अनेक ब्रँड सीएनजी कारचे मॉडेल लाँच करण्याच्या विचारात आहेत. एकीकडे इलेक्ट्रीक कारना मागणी असतानाच सीएनजीवर देखील ग्राहकांचा विश्वास अजून कायम आहे.
निसान,रेनो आणि होंडा कंपनीने आपल्या कारमध्ये डिलरशिप फिटमेंटवाले सीएनजीचा ऑप्शन देण्यास सुरुवात केली आहे. तसेच महिंद्र आणि स्कोडा सारखे ब्रँड सीएनजी लाँच करण्याच्या विचारात आहेत. जर तुम्हीही सीएनजी कारण खरेदी करण्याच्या विचारात आहात. तर तुमच्या साठी आम्ही बेस्ट सेलिंग सीएनजी कारची यादी आणली आहे.
सर्वात जास्त विकली जाणारी कारया यादीत देशात सर्वात जास्त विकली जाणारी सीएनजी कारण मारुती सुझुकी एर्टीगा आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मारुती सुझुकी एर्टीगाच्या १,४५,४८० युनिट्स विकल्या गेल्या आहेत. भारतीय सीएनजी पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये या कारची हिस्सेदारी १४.३ टक्के आहे. ही सात आसनी कार लो रनिंग कॉस्ट आणि चांगल्या स्पेसचा प्रॅक्टीकल ऑप्शन आहे. यामुळे ही कार अनेक वर्षांपासून सेलिंग एमपीव्ही आहे.
दुसऱ्या क्रमांकावर देखील मारुती सुझुकीची कारयानंतर दुसऱ्या क्रमांकावर देखील मारुती सुझुकीची कारच आहे. ही कार आहे मारुती सुझुकी डिझायरची आहे.या कारच्या सीएनजी आवृत्तीची या आर्थिक वर्षात १,३५,३३० युनिट्स विकल्या गेल्या आहेत. या कारची हिस्सेदारी १३.३ टक्के आहे. विशेष म्हणजे मार्च २०२६ मध्ये ही बेस्ट सेलिंग कार झाली होती.
वॅगनआर सीएनजी तिसऱ्या क्रमांकावरमारुतीची सुझुकी वॅगनआर सीएनजी तिसऱ्या क्रमांकावर येते. या कारच्या या वर्षी ९६,३८१ यूनिट्स विकल्या गेल्या आहेत. या कारचा शेअर ९.५ टक्के आहे. ही स्वस्तातील सीएनजी हॅचबॅक आहे. ज्याला भारतात मोठ्या संख्येने लोक पसंद करत आहेत. मारुती ब्रेझाच्या ७१,३२९ युनिट्सना आर्थिक वर्षे २०२६ मध्ये विकले आहे. हीचा मार्केट शेअर ७.० टक्के आहे.
टॉप-५ मध्ये ४ सीएनजी कार मारुती कंपनीच्याम्हणजेच टॉप-५ सीएनजी कार विक्रीमध्ये चार कार मारुती कंपनीच्या आहेत. पाचव्या क्रमांकावर टाटा नेक्सन कार आहे. या कारच्या या आर्थिक वर्षात ६९,१६८ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तसेच सहाव्या क्रमांकावर टाटा पंच आहे. या कारच्या ६७,४६८ युनिट्स सीएनजी विकल्या आहेत. मारुती सुझुकी ईको या यादीत एक मात्र व्हॅन आहे.ज्याच्या ६६,६७५ युनिट्स विकल्या आहेत.
अर्ध्यावरुन जास्त सीएनजी मार्केटवर ताबाहुंडई ऑराची ६२,६१२ युनिट्स, मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या ५४,८०५ युनिट्स आणि मारुती व्हिक्टोरिसची ३५,६७७ युनिट्स या आर्थिक वर्षात विकल्या गेल्या आहेत. जर टॉप १० सीएनजी कारच्या यादीवर लक्ष दिले तर सर्वात जास्त सीएनजी कार मारुती सुझुकीने विकल्या आहेत. अर्ध्यावरुन जास्त सीएनजी मार्केटवर मारुती सुझुकीचा ताबा आहे.