दिल्ली कॅपिट्ल्सने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील43 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. दिल्लीने होम टीम राजस्थानला पराभूत करत आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करुन 2 गुणांची कमाई केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्लीसमोर जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 226 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 5 बॉलआधी 7 विकेट्स राखून पूर्ण केलं.दिल्लीने 19.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 226 धावा केल्या. दिल्लीने अशाप्रकारे या मोसमातील चौथा सामना जिंकला. दिल्ली 4 सामने जिंकणारी सहावी टीम ठरली.
त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. राजस्थानसाठी चौघांनी दुहेरी आकडा गाठला. राजस्थानसाठी कॅप्टन रियान पराग याने सर्वाधिक धावा केल्या. रियानने 50 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोरसह 90 धावा केल्या. ध्रुव जुरेल याने 42 धावांचं योगदान दिलं. रवींद्र जडेजा याने 20 धावा केल्या.
तसेच डोनोवन फेरेरा याने अखेरच्या क्षणी चाबूक खेळ करत फिनिशिंग टच दिला. डोनोवनने 14 बॉलमध्ये 335.71 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 47 रन्स केल्या. डोनोवनने या खेळीत 6 सिक्स आणि 2 फोर लगावले. तर दिल्लीसाठी मिचेल स्टार्क याने तिघांना आऊट केलं. तर कायल जेमीसन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.