Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?
esakal May 02, 2026 01:45 PM

Maharashtra HSC Result 2026 : बारावी (HSC) परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपलीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल अधिकृतरित्या जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपला निकाल ऑनलाइन पाहता येईल.

आज सकाळी ११ वाजता पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामध्ये राज्याचा एकूण निकाल, विभागनिहाय उत्तीर्ण टक्केवारी आणि इतर महत्त्वाची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra Government : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लंडनमध्ये 'अध्यासन'; राज्य सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार खास स्कॉलरशिप!

यंदा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये बारावीची परीक्षा पार पडली. राज्यभरातून सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

विद्यार्थ्यांना खालील अधिकृत वेबसाइट्सवर निकाल पाहता येणार आहे:

hscresult.mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

तसेच, डिजिलॉकरवरही निकालाची माहिती उपलब्ध होणार आहे.

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय! बारावीचा निकाल कसा पाहाल?

विद्यार्थ्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:

अधिकृत वेबसाइटपैकी कोणतीही एक साइट उघडा

‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा

तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर प्रविष्ट करा

आईचे पहिले नाव टाका

‘View Result’ बटणावर क्लिक करा

तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल; त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट घेऊ शकता

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवरच निकाल तपासावा, तसेच इंटरनेट स्लो असल्यास संयम राखण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.