Maharashtra Board 12th Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर पाहायचा? या नंबरवर SMS करा आणि लगेच पाहा तुमचा निकाल
GH News May 02, 2026 03:19 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वीचा निकाल आज, शनिवार २ मे २०२६ रोजी १२ वाजता ऑनलाईन प्रसिद्ध होणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊही विभागीय मंडळांचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल. निकाल पाहताना अनेकदा वेबसाईटवर लोड आल्याने सर्व्हर स्लो होतो. अशा वेळी तुम्ही खालील सोप्या पद्धतीने SMS द्वारे निकाल मिळवू शकता:

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी काय कराल?

१. मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHHSC <स्पेस> सीट नंबर असा मेसेज टाईप करा.

२. हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.

३. काही वेळातच तुमचा विषयनिहाय निकाल तुमच्या मोबाईलवर एसएमएस स्वरूपात प्राप्त होईल.

निकाल पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी:

ऑनलाईन निकाल पाहताना किंवा एसएमएस मिळवताना तुमच्याकडे खालील दोन गोष्टी असणे आवश्यक आहे:

विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)

आईचे नाव (Mother’s First Name)

निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…

कुठे पाहाल ऑनलाईन निकाल?

विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही आपला निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:

mahresult.nic.in

किती टक्के लागला निकाल?

महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील विज्ञान, कला वाणिज्य आयटीआयसाठी १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास झालेले विद्यार्थी ८९.७९ टक्के आहे. खासगी विद्यार्थी १७ फॉर्म भरणारे ३६ हजार ९४१ प्रविष्ट झाले. उत्तीर्ण झालेले २९ हजार ६३४ आहेत. एकूण टक्केवारी ८०.२१ आहे. रिपीटर एकूण ५० हजार ३४६ विद्यार्थी १८ हजार ३४९ उत्तीर्ण झाले.

महत्त्वाची टीप: निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर लॉग-इन करत असल्याने संयम ठेवावा. एसएमएसची सुविधा ही निकाल त्वरित मिळवण्यासाठी सर्वात सोपा पर्याय आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.