HSC Board Result 2026: परीक्षा क्रमांक टाकूनही निकाल नाही दिसला? घाबरू नका, इयत्ता 12वीचा Result कधी दिसणार? एका क्लिकवर जाणून घ्या
Tv9 Marathi May 02, 2026 04:45 PM

HSC Board Result 2026: इयत्ता 12 बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची झुबंड उडाली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकच गर्दी केली आहे. त्यामुळे साईटवर लोड आला आहे. साईट स्लो झाली आहे. परीक्षा क्रमांक टाकूनही तुमचा निकाल दिसत नसेल, तर घाबरून जाऊ नका. हा निकाल तुम्हाला थोड्याच वेळात दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 वीचा निकाल विना व्यत्यय पाहता यावा यासाठी काही बदल केले आहे.

काही निकाल 1 वाजता पाहता येणार

इयत्ता 12 वीचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळासह इतर साईटवर पालक आणि विद्यार्थ्यांच्या उड्या पडल्या आहेत. त्यामुळे साईटवर खूप लोड आला आहे. नंबर टाकूनही निकाल दिसत नाही. अथवा साईट उघडण्यासाठी वेळ लागत आहे. ही बाब अगोदरच हेरून बोर्डाने काही निकाल दुपारी 12 वाजता सुरू करतोय. तर काही निकाल दुपारी 1 वाजता सुरू करत आहे. 20 ते 40 टक्के लोक दुपारी 12 वाजता निकाल पाहतील. वेबसाईटवर ट्रॅफिक वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

या ठिकाणी पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची वेबसाईट, डीजीलॉकर, एमकेसीएल, टार्गेट पब्लिकेशन, नवनीत, टीव्ही 9 मराठी, इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जर तुमचा निकाल आता दिसत नसेल, तर दुपारी 1 वाजता या संकेतस्थळांना भेट द्या. तिथे तुमचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकल्यास तुम्हाला निकाल दिसले. सर्व विद्यार्थी एकावेळी निकाल शोधू लागले तर साईटवर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून मंडळाने ही खबरदारी घेतली आहे.

साईट स्लो असेल तर मग SMS करा

जर साईट स्लो झाली असेल आणि निकाल कळत नसेल तर अजून एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांना इयत्ता 12 वीचा निकाल SMS द्वारे सुद्धा पाहता येईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव 57766 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या एसएमएस बॉक्समध्ये निकालाचा संदेश येईल. विषयानुसार तुम्हालानिकाल समजेल.

निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.