Kolhapur Shahuwadi brother kills brother : (शाम पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. नगरपालिकेच्या इमारतीच्या पाठीमागील जागेत इमारत बांधकामावर काम करणाऱ्या एका कामगाराचा खून झाल्याचे आढळले. मृत कामगार हा मूळचा छत्तीसगड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सख्या मोठ्या भावानेच छोट्या भावाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. रात्री उशिरा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. मात्र, या भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खून करून आरोपी मोठा भाऊ घटनास्थळावरून पसार झाला आहे.
आज सकाळी इतर कामगार कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती समजताच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
Kolhapur Lodge Raid: कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर लॉजवर नाजूक प्रकरणातून पोलिसांनी धाड टाकली अन्, एक पिडीत महिला...दरम्यान, गेल्या आठवड्यातही या दोघा भावांमध्ये तीव्र वाद झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडीपोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.