इतकी भयंकर आग… कुणी बेडवरून उठू शकलं नाही, तर कुणी शिड्यांवरच धडाधड पेटले… एसीच्या ब्लास्टनंतर नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi May 03, 2026 03:45 PM

दिल्ली येथील विवेक विहार येथे चार मजल्याच्या बिल्डिंगला भयानक आग लागली आहे. या अपघातात आतापर्यंत 9 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आग इतकी भयंकर होती की, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचे प्राण वाचवण्यसाठी देखील वेळ मिळाला नाही. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या मागील बाजूस असलेल्या एका एसीचा स्फोट झाला, ज्यामुळे पहाटे जवळपास साडेतीनच्या सुमारास आग लागली. आग इतकी भीषण होती की, तिसऱ्या मजल्यावर देखील पोहोचली. आग वाढत असल्याचं लक्षात येताच लोकांनी आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले.

तिसऱ्या मजल्यावर राहणारे लोक स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी गच्चीत गेले. पण गच्चीचा दरवाजा बंद असल्यामुळे तेथेच अडकले आणि शिड्यांवर त्यांचे प्राण गेले… ज्या मजल्यावर आग लागली तिथे चार जण उपस्थित होते आणि  त्यांचाही आगीत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं, त्यांनी बिल्डिंगच्या समोरील बाजूस राहणाऱ्या लोकांचा बचाव केला. पण मागे राहणाऱ्या लोकांना वाचवू शकले नाहीत. मृतदेह इतक्या प्रमाणात जळाले होते की, त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, तीन मृतदेह पलंगावर आढळले. याचा अर्थ आग इतकी भीषण होती की, त्यांना पलंगावरून उठता देखील आलं नाही आणि भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, पण हा आकडा वाढण्याची देखील शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मी सकाळी 5 वाजता उठलेलो. पाहिलं तेव्हा आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. मी व्हिडीओ देखील काढला… मागच्या लोखंडी सळ्या कापून दोन-तीन लोकांना वाचवण्यात आलं; एका मुलीला आणि एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. पोलिसांनी सांगित्यानुसार, नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी तीन मृतदेह जिन्यावर सापडले…

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा घटना स्थळी पोहोचले. ते म्हणाले, ‘माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचलो आणि थेट वरच्या मजल्यावर गेलो… दुसऱ्या मजल्यावर मागच्या बाजूला पाच मृतदेह मी पाहिले. ‘
स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले, “माहिती मिळताच मी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर मी थेट वरच्या मजल्यावर गेलो. मी नुकताच वरच्या मजल्यावरून खाली आलो आहे. दुसऱ्या मजल्याच्या मागच्या बाजूला पाच मृतदेह आढळले. सध्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरु आहे.’

लुथरा पुढे म्हणाले, ‘अधीक तपास सुरु आहे. पण जोपर्यंत DNA तपासणी होत नाही. तोपर्यंत मृत पावलेल्या लोकांची ओळख पटणार नाही… एकूण नऊ मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. लोक या घटनेला शॉर्ट सर्किट म्हणत आहेत, परंतु घटनेचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.’ घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.