Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
Tv9 Marathi May 03, 2026 03:45 PM

Monsoon 2026 Alert: भारतीय हवामान विभागाने मोठी आनंदवार्ता दिली आहे. अल निनोमुळे (El Nino) यंदा सूर्य आग ओकत आहे. तर पाऊस लांबण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण या सर्वांचे मळभ झटकून पावसाचा सांगावा आला आहे. IMD नुसार दक्षिण-पश्चिम मान्सून हा त्याच्या निर्धारीत प्रवास लवकर पूर्ण करणार आहे. तो जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळम राज्यात दाखल होणार आहे. अर्थात यंदा पावसावर अल निनोचे सावट आहे. El Nino मुळे पावसाचा जोर कमी असेल. पण पाऊस उशीरा येणार नाही हा मोठा दिलासा आहे. तर युरोपातील काही हवामान संस्थांनी भारतात मान्सून हा जून महिन्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून होणार दाखल

IMD चे महा संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले की, 14 ते 20 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून सक्रिय होईल. या पट्ट्यात जोरदार पाऊस कोसळेल. सरकारी आकडेवारीनुसार हा परिसर देशात मान्सूनचा सांगावा आणण्याचे काम करतो. इथून मान्सून सक्रिय होत तो केरळम राज्यात दाखल होतो आणि मग भारतभर पोहचतो.

अल-निनो सक्रिय होण्याची चिंता सुद्धा आहे. IMD नुसार दीर्घकालीन पूर्वअंदाजानुसार जून ते सप्टेंबर या महिन्यात नियमित पावसापेक्षा यंदा पर्जन्यमान कमी असेल. सध्या अल निनोची भीती असली तरी भारतावर त्याचा मोठा प्रभाव अद्याप दिसलेला नाही.जुलै महिन्यात अल निनो भारतात कहर दाखवण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी जुलै महिन्यात मान्सूनला फटका बसू शकतो.

मे आणि जूनमध्ये धुवांधार

IMD ने मे 2026 साठी जो पूर्वअंदाज वर्तवला आहे, त्यात देशभरात काही भागात मुसळधार पाऊस पडेल. नेहमीच्या पावसापेक्षा हे प्रमाण 110% जास्त असेल. ॲग्रोकेम फेडरेशन ऑफ इंडियाचे महासंचालक कल्याण गोस्वामी यांनी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जमीन भूसभूशीत होण्यास मदत होईल असे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यास उपयुक्त वातावरण तयार होईल. तरीही शेतकऱ्यांनी जून महिन्यातील पावसाचा अंदाज घ्यावा आणि दुबार पेरणीचे संकट ओढावणारी यासाठी माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 15 मेपर्यंत मान्सून सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.