
ज्येष्ठ महिना आला की, स्त्रियांना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. वट सावित्री व्रत (अमावस्या) आणि व्रत सावित्री पौर्णिमा हे दोन्ही व्रत विवाहित महिलांसाठी खास असतात. विवाहित स्त्री तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौभाग्यासाठी हे व्रत करतात. यंदा महाराष्ट्रात वट पौर्णिमा 29 जून रोजी साजरी होईल तर वट सावित्री व्रत (अमावस्या) 16 मे रोजी साजरी होईल. आज आपण या दोघांमधील फरक जाणून घेऊयात.
वट सावित्री व्रत हे प्रामुख्याने दोन तिथींना साजरे केले जाते. वट सावित्री अमावस्या आणि वट सावित्री पौर्णिमा. या दोन्ही व्रतांमागचा उद्देश आणि पूजेची पद्धत एकच असली तरी भौगोलिक प्रदेश आणि पंचांगानुसार त्यांच्यात मुख्य फरक आढळून येतो.
वट सावित्री व्रत (अमावस्या)
हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला केले जाते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणा या भागात हा सण साजरा होतो.
हेही वाचा – देवपूजेत दिव्याचे महत्व आणि प्रकार
वट सावित्री पौर्णिमा
महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो.
फरक काय?
वट सावित्री व्रत आणि वट सावित्री पौर्णिमा या दोन्ही व्रतांमध्ये फारस फरक नाही. दोन्ही व्रते पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केली जातात. सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे (सत्यवानाचे) प्राण परत मिळवले, त्या घटनेची स्मृती म्हणून ही व्रते केली जातात.
हेही वाचा – श्रीकृष्णाने सांगितलेले ‘निष्काम कर्म’ म्हणजे काय?