या चिमुरडीने साकारलीय राजा शिवाजी सिनेमात लहानग्या सईबाई राणीसाहेबांची भूमिका !
esakal May 03, 2026 08:45 PM

Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमाची. या सिनेमाने अवघ्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई या सिनेमाने केली आहे. त्यातच या सिनेमात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती महाराणी सईबाईंची लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या छोट्या चिमुरडीची. तिचा अभिनय सगळ्यांना भावला आहे. ही चिमुरडी कोण आहे याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

तर ही चिमुरडी आहे किमया मेस्त्री. तिचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. किमयाने या आधी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा तिचा पहिला सिनेमा होता.

किमया फक्त अभिनयच नाही तर कत्थक नृत्यही शिकते आहे. सोशल मीडियावर तिने तिचे कत्थक करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. याशिवाय तिने उदे ग अंबे, सावळ्याची जणू सावली, जय जय स्वामी समर्थ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by किमया (@kimayamestry07_official)