मुलांचं शिक्षण आणि लग्नाची चिंता संपवा! LIC च्या 'या' योजनांचा लाभ घ्या, मजबूत निधी उभारा, जाणून घ्या सविस्तर माहिती
एबीपी माझा वेब टीम May 03, 2026 10:13 PM

LIC Schemes News : प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांच्या मुलामुलींचे शिक्षण आणि लग्न कोणत्याही अडचणींशिवाय पार पडावे. ही गरज लक्षात घेऊन, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) अनेक विशेष योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पॉलिसीधारकासोबत काही अनुचित घटना घडली तरी, मुलामुलींचे भविष्य सुरक्षित राहते. जाणून घेऊयात एलआयसीच्या तीन लोकप्रिय योजनांची माहिती जाणून घेऊयात.

मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी एक मजबूत निधी तयार करणाऱ्या योजना

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) जीवन लक्ष्य, जीवन तरुण आणि नवीन चिल्ड्रन्स मनी बॅक योजना मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी एक मजबूत निधी तयार करतात. तसेच अनपेक्षित घटना घडल्यास आर्थिक सुरक्षा देखील प्रदान करतात. त्यामुळं या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. 

जीवन लक्ष्य योजना

जीवन लक्ष्य ही एक अशी योजना आहे जी संरक्षण आणि बचत दोन्ही प्रदान करते. पॉलिसीधारकाच्या अकाली मृत्यूनंतर, कुटुंबाला विमा रकमेचा काही भाग दरवर्षी मिळतो. मुदतपूर्तीनंतर एकरकमी रक्कम आणि बोनस देखील उपलब्ध होतो. ही योजना विशेषतः अशा पालकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना आपल्या मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसारख्या मोठ्या खर्चांची आगाऊ तरतूद करायची आहे.

जीवन तरुण योजना

ही योजना मुलांचे भविष्य लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. मूल 20 वर्षांचे झाल्यावर निधी मिळण्यास सुरुवात होते आणि पुढील 25 वर्षांपर्यंत विविध स्वरूपात निधी दिला जातो. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि सुरुवातीच्या कारकिर्दीसाठी एक मजबूत निधी तयार करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

नवीन चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन

ही योजना ठराविक कालावधीनंतर पैसे देते. मुलाचे वय 18, 20 आणि 22 झाल्यावर काही रक्कम दिली जाते आणि उर्वरित रक्कम 25 व्या वर्षी बोनससह दिली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, भविष्यातील प्रीमियम माफ केले जातात, परंतु मुलाला सर्व लाभ मिळत राहतात.

या योजना का निवडाव्यात?

या तीन योजना केवळ बचतीचा एक चांगला पर्याय नाहीत, तर त्या तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी सुरक्षा देखील प्रदान करतात. जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी एक सुरक्षित आणि नियोजित आर्थिक आधार हवा असेल, तर या योजना उपयुक्त ठरू शकतात.

45 रुपयांची बचत करा 25 लाख रुपयांचा निधी उभारा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.