Revenue Camp: भेंडाळा येथे महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध दाखल्यांचे वाटप, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत
esakal May 03, 2026 11:45 PM

कायगाव : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 अंतर्गत गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे गुरुवारी (ता. 30) रोजी महसूल मंडळ स्तरावरील एक दिवसीय समाधान शिबिराला शेतकरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भेंडाळा येथे सकाळी 11 वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.दरम्यान विविध दाखले वाटप करून शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

यावेळी माजी सभापती लक्ष्मणभाऊ सांगळे, माजी उपसभापती सुमित मुंदडा, पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ, तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, प्रभारी गटविकास अधिकारी अक्षय भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात नागरिकांना विविध दाखले, संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेचे अर्ज, 7/12 अद्यावतीकरण, 7/12 व 8अ वाटप, फेरफार उतारा, लक्ष्मी मुक्ती योजना, ई-हक्क प्रणाली, डिजिटल 7/12 अशा महसुली सेवा जागेवरच देण्यात आल्या. यासोबतच आयुष्मान भारत कार्ड, ॲग्रीस्टॅक नोंदणी, महा-डीबीटी, किसान क्रेडिट योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गाय गोठा योजना याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पोलीस दलात निवड झालेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी मनीषा कोतकर, ग्राम महसूल अधिकारी प्रभाकर धनायत, राजेश खरडकर, संदीप बोडखे, विनायक गोजरे, रत्नाकर पांचाळ, गीता सरग, गणेश लोणे यांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी सहाय्यक महसूल अधिकारी मोहमद बागेस, ग्रामपंचायत अधिकारी राहुल चरहाटे, सहायक कृषी अधिकारी वैशाली घुमरे, मनीषा तागड, कांचन गरड, के. बी. शिंदे, शिवाजी परभणे, चंद्रशेखर परभणे, केंद्रप्रमुख दिनेश देशपांडे, राजेंद्र पदार, विजयकुमार ढोले, बाळासाहेब गाढे,भाऊसाहेब वामन ,शिक्षिका संगीता दिसागज, सुवर्णा देशमुख,पूजा पवार,मनीषा कचरे,अंगणवाडी सेविका रूपाली तुपे, वैशाली खैरे,मंगल वखारे,मदतनीस रोहिणी भागवत, प्रवीण राऊत, सचिन तुपे, आरोग्य विभागाचे कर्मचारी व परिसरातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.