ना घर ना गाडी, ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती? आकडा वाचून चकित व्हाल; बँकेत फक्त…
Tv9 Marathi May 04, 2026 12:45 AM

Mamata Banerjee Net Worth : सध्या पश्चिम बंगाल हे राज्य देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडलेली असून आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी तेथील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने खूप प्रयत्न केले. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावणय्यासाठी भाजपानेदेखील पूर्ण ताकद पणाला लावली आहे. परंतु काहीही झाले तरी आम्हीच सत्तेत येणार, असा विश्वास तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्रस्थानी ठेवूनच तृणमूलने या निवडणुकीत प्रचार केला आहे. दरम्यान, या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याने ममता बॅनर्जी यांच्या संपत्तीची चर्चा होत आहे.

ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती किती?

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे फक्त 15.4 लाख रुपयांची संपत्ती आहे. म्हणजे त्या कोट्यधीशदेखील नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वत:चे घरही नाही. सोबतच त्यांच्याकडे कोणतीही कार किंवा चारचाकी वाहन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्या देशाच्या तसेच पश्चिम बंगालच्या राजकारणातील एक महत्त्वाच्या नेत्या आहेत. राजकारणी म्हटलं की त्यांची संपत्ती ही कित्येक कोटी रुपयांत असते परंतु ममता बॅनर्जी यांचा सर्वात गरीब असलेल्या नेत्यांमध्ये होतो.

ममता बॅनर्जी यांच्याकडे सोनं किती?

त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे एकूण स्थावर संपत्ती 15,37,509.71 रुपये एवढी आहे. या संपत्तीपैकी बहुसंख्य रक्कम ही बँकेत जमा आहे. त्यांचे इंडियन बँक या बँकेत बचत खाते असून त्यात एकूण 12,36,209.71 रुपये जमा आहेत. याशिवाय अन्य एका बँकेत त्यांनी 40 हजार रुपये जमा केलेले आहेत. त्यांचे एकूण 12,76,209 रुपये बँकेत आहेत. त्यांच्याकडे 75,700 रुपये रोख स्वरुपात आहेत. त्यांच्याकडे 9 ग्रॅमचे 750 मिलीग्रॅमचा एक सोन्याचा दागिना आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे शेतीही नाही. त्यांच्याकडे स्वत:चे वाहनदेखील नाही.

दरम्यान, 2023–24 साली ममता बॅनर्जी यांच्या संपत्तीचे मूल्य 20,72,740 रुपये होते. 2024-25 साली त्यांच्या संपत्तीचे मूल्य हे 23,21,570 होते. 2021-22 साली त्यांच्या संपत्तीचे मूल्य 38,14,410 रुपये होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.