विधान परिषद निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल
उद्धव ठाकरेंचा पक्षात ‘सर्जिकल स्ट्राइक’
परभणी जिल्हा प्रमुख पदावर बदल
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आली असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकांआधी ऑपरेश टायगरची चर्चा सुरू होती. ठाकरेंचे खासदार शिंदेच्या पक्षात जाणार असल्याचं चर्चांना पेव फुटले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? महत्त्वाची अपडेट आली समोरआताही ठाकरे गटात बंडाळी होण्याची चर्चा होती. अशातचउद्धव ठाकरेंनीपक्षात सर्जिकल स्ट्राइक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे सेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहेत. संजय जाधव हे ठाकरे सेनेसोबत आहेत, असं खुद्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगतिले होते. त्याचदरम्यान आता परभणीमधील एक राजकीय बातमी आहे. ज्यामुळे खळबळ उडवून दिली आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार? ठाकरे गटानं दिली महत्त्वाची अपडेटशिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे. गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख पदी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करून खासदार संजय (बंडू जाधव ) यांना ठाकरेंनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
खासदार संजय जाधव आणि त्यांचे काही समर्थक परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरेंच्या यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. यात गंगाप्रसाद आनेराव यांचाही समावेश होता. तसेच उपजिल्हाप्रमुख आणि काही तालुकाप्रमुखही अनुपस्थित होते. त्यामुळेच आता गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.