कायगाव : लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कायगाव येथे शिवव्याख्याते शिक्षक दीपक शेषराव वाबळे यांचा सेवापूर्ती सोहळा गुरूवारी (ता. ३०) रोजी दुपारी एक वाजता भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
गंगापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती इंदुमतीताई साहेबराव पाटील डोणगावकर अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, "शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. दीपक वाबळे सरांनी प्रदीर्घ सेवाकाळात अध्यापनासोबत शिवव्याख्याते म्हणून संस्कारांची पेरणी केली. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान विद्यालयासाठी प्रेरणादायी राहील."
प्रारंभी दीपक वाबळे व त्यांच्या पत्नी विजया यांचा इंदुमतीताईंच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री वाबळे भावूक झाले. "विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकाऱ्यांची साथ हीच माझ्या आयुष्याची खरी पुंजी आहे," असे ते म्हणाले.
यावेळी दादा महाराज वायसळ, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप निरपळ, संस्थेचे कोषाध्यक्ष विठ्ठल जाधव ,शालेय समिती अध्यक्ष शिवाजी कान्हे , शेषराव वाबळे गुरुजी, गं.स.साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद निरपळ,नानासाहेब वाघ, एस .पी .जवळकर, सादेक शेख,मिर्झा सलीम बेग, खालेद नाहदी, मोहसीन चाऊस,रावसाहेब तोगे, भूषणराव मोहिते, सामाजिक कार्यकर्ते वाजीद कुरेशी, जामगावचे बशीर पटेल, गंगापूरचे अविनाश पाटील,प्रभाकर जाधव, वाल्मिक शिरसाठ, भाऊसाहेब शेळके,कल्याण गायकवाड, सुरेश शिंदे,कैलास अडकूते ,दिलीप गवळी,संजय गायकवाड, गजानन गायकवाड, रोहिदास पवार तसेच आजी-माजी मुख्याध्यापक वे. वा. पवार, बी.के. पानकडे, मिलिंद दोंदे, कुलकर्णी, बाबुराव देशमुख, अशोक गवारे, मुख्याध्यापक अयुब शेख, सतीश कहाटे, गोविंद हिवाळे, विलास जाधव,आदी उपस्थित होते.
बोलेगाव, कायगाव, गणेशवाडी, लखमापूर, अमळनेर, भेंडाला, पखोरा परिसरातील नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अयुब शेख यांनी केले. सूत्रसंचालन जे. के. राऊत व तिलकेश्वर शिरसाठ यांनी, तर आभार राजेंद्र तारू यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.