Salman Khan Firing Case Bandra Bodyguard: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याला मिळालेल्या धमक्यांमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. सुपरस्टार सलमानला गुंड लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Entertainment) गोळीबार (Firing) करण्यात आला होता. धमकी आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणाबाबत त्याच्या पर्सनल बॉडीगार्डने मोठा खुलासा केला आहे. माहितीनुसार, सलमान खानच्या बॉडीगार्डने विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला. बॉडीगार्डच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभिनेत्याच्या बॉडीगार्डने विशेष न्यायालयात सांगितलं की, 'हा गोळीबार म्हणजे सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. गेल्या महिन्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती'. सुनावणीदरम्यान अभिनेत्याचा बॉडीगार्ड पहिला साक्षीदार म्हणून हजर होता. '14 एप्रिल 2024 रोजी 2 मोटरसायकलस्वारांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानाबाहेर गोळीबार केला', अशी माहिती बॉडीगार्डच्या जबाबातून समोर आली आहे..
View this post on Instagram
या घटनेची माहिती देताना, बॉडीगार्डने सांगितले की, '13 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता त्याच्या नेहमीच्या रात्रीच्या पाळीत रुजू झाला होता. धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. 14 एप्रिल रोजी, पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुरक्षा पथकाला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला होता. मी सीसीटीव्ही स्क्रीन पाहिली. हेल्मेट घातलेले दोन जण बाईकवरुन इमारतीच्या दिशेनं गोळीबार करत असल्याचं दिसलं'.
'हल्लेखोरांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या. त्यामुळं मी आणि तिथे उपस्थित असलेले इतर रक्षक तात्काळ मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले', अशी माहिती बॉडीगार्डने दिली. '2 मोटारसायकलस्वार उजवीकडे आय लव्ह वांद्रे पॉइंटच्या दिशेनं धावले. तिथून ते मेहबूब स्टुडिओ रोडच्या दिशेने गेले', अशी माहिती बॉडिगार्डने जबाबात दिली. यादरम्यान, स्पेशल पब्लिक प्रॉसीक्यूटर महेश मुळे यांनी न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज सादर केले.
बॉडीगार्डने स्पष्ट केलं की, 'हल्ल्याच्यावेळी सलमान खान पहिल्या मजल्यावरील त्याच्या बेडरुममध्ये होता. हा गोळीबार म्हणजे अभिनेत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता', असंही बॉडीगार्डने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
कावीळमुळे जीव गेला; रिलस्टार प्रथमेश कदमचं शेवटचं स्वप्न काय होतं? आईनं सांगितली शेवटची इच्छा