Kolkata Live : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून संपूर्ण देशाचे लक्ष विशेषतः पश्चिम बंगालकडे लागले आहे. ममता बॅनर्जी यांना सत्ता टिकवण्यात यश मिळाल्यास प्रादेशिक पक्षांना मोठा दिलासा मिळेल, तर भाजप विजयी झाल्यास प्रादेशिक पक्षांच्या बालेकिल्ल्यांमध्येही पक्ष आपली ताकद सिद्ध करू शकतो, असा संदेश जाईल. केरळमध्ये डाव्या आघाडीचे अस्तित्व, काँग्रेसच्या आशा, तमिळनाडूमधील नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी आणि आसाममध्ये विकास व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर जनतेचा कौल काय लागतो याकडेही देशभराचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक उपाययोजना लागू केल्या असून प्रत्येक निकाल भविष्यातील राष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
Assembly election results 2026 Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीसह मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवातदेशभराचे लक्ष लागलेल्या तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या निकालांची मतमोजणी ४ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतांची गणना केली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.