बंगालपासून तामिळनाडूपर्यंत कुणाची सरशी? कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा? फलोदी सट्टा बाजाराचा धक्कादायक अंदाज
जयदीप मेढे May 04, 2026 11:13 AM

West Bengal Election Result 2026: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Election Result 2026) पार पडल्या असून आता सर्वांचे लक्ष आज (४ मे रोजी) होणाऱ्या मतमोजणीकडे (Election Result 2026) लागले आहे. एकीकडे वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल चर्चेत असताना राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील फलोदी सट्टा बाजार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी येथील निवडणूक निकालांबाबत या फलोदी सट्टा बाजारने आपले अंदाज जाहीर केले असून कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागल्याची चर्चा आहे.(West Bengal Election Result 2026)

राजकीय वातावरणाची नाडी ओळखण्यासाठी ओळखला जाणारा फलोदीचा सट्टा बाजार निवडणुका, हवामान आणि मोठ्या घटनांबाबत अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानातील हे छोटेसे गाव सट्टा बाजारामुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिचित झाले आहे. येथे सट्टेबाज विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका आणि इतर मोठ्या राजकीय घडामोडींवर आपले भाव ठरवतात. अनेक जण हे भाव तळागाळातील वातावरणाचे संकेत मानतात.(Election Result 2026)

मात्र, हे कोणतेही अधिकृत किंवा वैज्ञानिक सर्वेक्षण नसून पूर्णपणे अंदाज आणि जोखमीवर आधारित प्रक्रिया असल्याचेही तितकेच खरे आहे. अनेकदा हे अंदाज अचूक ठरले आहेत, तर काहीवेळा पूर्णपणे उलटही गेले आहेत. तरीदेखील माध्यमे आणि सर्वसामान्यांमध्ये या आकड्यांबाबत मोठी उत्सुकता कायम असते.(Election Result 2026)

अलीकडच्या काळात फलोदी सट्टा बाजाराचे ताजे भाव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. विविध राजकीय पक्षांच्या बाजूने झुकते माप दिसत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. फलोदी सट्टा बाजाराला निवडणूक अंदाजाचे अनौपचारिक केंद्र म्हटले जाते, मात्र त्यातील आकडे अंतिम सत्य मानण्याऐवजी केवळ संकेत किंवा ट्रेंड म्हणून पाहणे अधिक योग्य मानले जाते.

Election Result 2026 :  पश्चिम बंगालमध्ये काट्याची टक्कर

२९४ सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभेत बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला १५० ते १५६ जागा मिळू शकतात, तर तृणमूल काँग्रेसला १३७ ते १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. येथे अतिशय चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Election Result 2026 : आसाममध्ये भाजप आघाडी मजबूत

१२६ सदस्यीय आसाम विधानसभेत बहुमताचा आकडा ६४ आहे. येथे भाजप आघाडीला ९१ ते १०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आघाडीला २१ ते ३१ जागा मिळू शकतात, तर इतरांच्या वाट्याला ० ते ३ जागा जाण्याची शक्यता आहे.

Election Result 2026 : केरळमध्ये रंगतदार सामना

१४० सदस्यीय केरळ विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे. फलोदीच्या अंदाजानुसार यूडीएफला ७८ ते ९० जागा मिळू शकतात. एलडीएफला ४९ ते ६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आघाडीला ० ते ३ जागा मिळू शकतात.

Election Result 2026 : तामिळनाडूत डीएमके आघाडी पुढे

२३४ सदस्यीय तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. येथे डीएमके आघाडीला १२५ ते १४५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एआयएडीएमके आघाडीला ६५ ते ८५ जागा, टीव्हीकेला १६ ते २६ जागा आणि इतरांना १ ते ६ जागा मिळू शकतात.

Election Result 2026 : पुदुच्चेरीत भाजप आघाडीला यश मिळण्याची शक्यता

केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीच्या ३० सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा १६ आहे. फलोदी सट्टा बाजारानुसार येथे भाजप आघाडीला १६ ते २० जागा मिळू शकतात. काँग्रेस आघाडीला ६ ते ८ जागा, तर इतरांना ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

सट्टा बाजाराशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, मतमोजणीपूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत या अंदाजांमध्ये चढ-उतार होत राहतात. या आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.