Ajay-Atul Dance to Their Own Song: अजय - अतुल (Ajay Atul) ही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील सुपरहिट जोडी. या जोडीनं आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली. तसेच बऱ्याच गाण्यांना संगीतही दिले. लग्न असो किंवा पार्टी अजय - अतुल यांची गाणी हमखास वाजतात. सातासमुद्रापार अजय - अतूल यांची गाणी फेमस झाली आहेत. फँड्री चित्रपटातील, 'तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला', त्यांचं हे गाणं तुफान गाजलं. तसेच सैराटमधलं 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यानं लोकांना आपल्या तालावर थिरकवलं.
लोकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे अजय - अतुल, आज स्वत: गाण्यावर ठेका धरताना दिसले. या प्रसिद्ध जोडीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. सध्या सोशल मीडियात अजय - अतूल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजय - अतूल चक्क थिरकताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अजय - अतूल यांचं झिंगाट हे गाणं प्रत्येक पार्टी आणि फंक्शनमध्ये वाजतं. याशिवाय कोणताही कार्यक्रम असो अपूर्ण आहे. झिंगाट या गाण्यातून थिरकण्याची एक वेगळीच उर्जा मिळते. अजय - अतूल देखील स्वत:ला रोखू शकले नाहीत. लग्नाच्या वरातीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजय - अतूल ही जोडी स्वत:च्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.
स्वत:च्याच गाण्यावर अजय - अतूल या जोडीनं तुफान डान्स केला, एन्जॉयही केला. हा व्हिडीओ समृद्धी थोपते या इन्स्टाग्राम यूझरने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तरुणी स्वत: देखील गाण्यावर थिरकत आहे. या व्हिडीओत 'डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या DJला हे गाणं वाजत आहे'. या गाण्याला संगीत अजय - अतुल यांनी दिलं आहे. या गाण्यावर अजय - अतूल बेभान होऊन थिरकताना दिसत आहेत.