MI vs LSG : रोहित-रिकेल्टनचा झंझावात, मुंबईचा वानखेडेत जबरदस्त विजय, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा
admin May 05, 2026 02:25 AM
[ad_1]

रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर 4 मे रोजी 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. निकोलस पूरन याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौने मुंबईसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 8 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. मुंबईने 18.4 ओव्हरमध्ये 229 धावा केल्या. मुंबईचा हा या मोसमातील वानखेडे स्टेडियममधील दुसरा तर एकूण तिसरा विजय ठरला. तर लखनौ पुन्हा एकदा अपयशी ठरली.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.