आसाम आणि बंगालमध्ये भाजपाचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
Tv9 Marathi May 05, 2026 03:45 AM

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांत भाजपाचा तीन राज्यात मोठा विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमुळ काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे.आसाम आणि पद्दुचेरी या राज्यातही भाजपाचे सरकार येत आहे. आसाममध्ये भाजपाने तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाजपाची अनेक वर्षांची या राज्यात शिरकाव करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. पाच राज्यांपैकी आता प.बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी या तीन राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या राज्यातील भाजपाच्या विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, ‘ आसाम आणि बंगाल ही स्पष्ट उदाहरणे आहेत जेथे निवडणूक आयोगाच्या (EC) मदतीने भाजपाने निवडणूक चोरली आहे. आम्ही ममताजींशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० हून अधिक जागा चोरल्या गेल्या आहेत. हीच कार्यपद्धती ( playbook ) आम्ही यापूर्वीही पाहिली गेली आहे:
मध्य प्रदेश.
हरियाणा.
महाराष्ट्र.
लोकसभा २०२४ इत्यादी.

अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपाचा विजयाचा समाचार घेतला आहे.

येथे पोस्ट पाहा –

Assam and Bengal are clear cases of the election being stolen by the BJP with the support of the EC.

We agree with Mamata ji. More than 100 seats were stolen in Bengal.

We have seen this playbook before:
Madhya Pradesh.
Haryana.
Maharashtra.
Lok Sabha 2024 etc

चुनाव चोरी,…

— Rahul Gandhi (@RahulGandhi)

तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील विजय !

या आधी राहुल गांधी यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये आपण थिरु विजय यांच्या बोललो आहोत आणि टीव्हीकेच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. हा जनादेश तरुणांच्या वाढत्या आवाजाचे प्रतिबिंब आहे, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि केले जाणारही नाही.

तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. मी पुन्हा एकदा सांगू इच्छीतो की काँग्रेस पक्ष तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील जनतेचे रक्षण आणि सेवा करणे अविरतपणे सुरूच ठेवेल असे या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.