ममता बॅनर्जींचा दारुण पराभव करणाऱ्या 'त्या' भाजप नेत्याचं शिक्षण जाणून व्हाल हैराण
Tv9 Marathi May 05, 2026 02:45 PM

4 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जी यांना मोठा धक्काच बसला. जो मतदार संघ ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला होता, तेथेत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. अशात बंगालमध्ये फक्त सत्ता उलटली नाही तर, नवीन इतिहास घडला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता यांचा पराभव केला आहे. सांगायचं झालं तर, 4 मे रोजी असं काही घडलं ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल. मेदिनीपूर येथील शुभेंदु अधिकारी यांनी फक्त स्वतःट गड वाचवला नाही तर, त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा थेट पराभव करून संपूर्ण देशाला धक्का दिला. आता फक्त एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे दादाच आता बंगालचे पुढचे मुख्यमंत्री होणार का?

शिक्षणात अव्वल आहेत शुभेंदु अधिकारी

राजकीय रिंगणात विरोधांवर मात करणारेशुभेंदु अधिकारी शिक्षणात देखील अव्वल आहे. शुभेंदु अधिकारी यांनी मेदिनीपूरमधील स्थानिक शाळांमध्ये आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांनी 1987 मध्ये कांथी मॉडेल स्कूलमधून उच्च माध्यमिक म्हणजेच 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला.

ग्रेज्युएशन आणि मास्टर्स…

शुभेंदु अधिकारी त्यांचं ग्रेज्युएशनचं शिक्षण पी.के. कॉलेज येथून घेतलं. पण त्यांनी शिक्षण याठिकाणी थांबवलं नाही. शुभेंदु अधिकारी यांना शिक्षणाची आवड इतकी होती की, त्यांनी कोलकाता येथील नामांकित रवींद्र भारती विद्यापीठात शिक्षण घेतलं, जिथे त्यांनी एम.ए. पदवी मिळवली. याचा अर्थ, राजकीय प्रवास सुरु करण्यापूर्वी त्यांना कलांचं सखोल ज्ञान होतं

शुभेंदु अधिकारी यांच्याकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव

शुभेंदु अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा 15 हजार 105 मतांनी पराभव केली. हा विजय फार मोठी गोष्ट आहे, कारण भवानीपूर मतदारसंघ ममता बॅनर्जींचा मानला जात होता… या विजयानंतर शुभेंदु अधिकारी यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे… पण भाजप सध्या त्यांच्या विजयाला बंगालचा ऐतिहासिक विजय म्हणून साजरा करत आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममता बॅनर्जी यांनी 15 वर्षांची सत्ताच गमावली असे नाही. तर त्यांचा हुकमी एक्का भवनीपूर मतदारसंघही त्यांना गमवावा लागला. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा मतदारसंघ तर गेलाच, पण राज्यातही त्यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.