सुरगाणा - तालुक्यातील साजोळे येथील नराधम आरोपी चंदर दौलत गांगोडे (वय-३५) रा. डांगराळे याने २ अल्पवयीन मुलींवर २०२१ मध्ये दिपावली सणाच्या कालावधीत नांदूरी, ता. कळवण तसेच साजोळे येथे पिडीत मुलगी व तिची मैत्रीण या दोघीही अल्पवयीन असतांना अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तुमचे दोघींचे दुस-या मुलासोबत लफड आहे, असे तुमच्या घरच्यांना सांगतो अशी भीती दाखवून धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केला.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांनी अत्यंत कसोशीने करीत आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून मा. सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्यात अति. सरकारी अभियोक्ता श्रीमती भानुप्रिया नितीन पेठकर यांनी तसेच पैरवी अमंगलदार महिला पोलीस हवालदार वैशाली भोर, विजय बोडके यांनी कामकाज पाहिले असून यातील आरोपी चंदर गांगोडे विरुद्ध गुन्हा शाबित झाल्याने तसेच गुन्हे दोषसिध्द विभाग नाशिक येथील सपोनि श्रीकांत पाटील, महिला पोलीस अमंगलदार अश्विनी परदेशी यांनी गुन्ह्यातील महत्त्वाचे साक्षीदार व पंच तपासी अधिकारी यांना वेळोवेळी कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिल्याने गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा भादवी ३७६ (२) आय एन पोक्सो ४,७,१२ नुसार खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपींस आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, दोन्ही पिडीत मुलीस प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसान भरपाई व रक्कम न दिल्यास दोन वर्षे साधा कारावास. अशी मा. जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी पैरवी अमंगलदार व दोषसिध्दी विभागातील अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर सुनावलेल्या शिक्षेच नागरिकांनी स्वागत केले आहे.