पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न, घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला!
Tv9 Marathi May 06, 2026 03:45 AM

Pune News : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 60 वर्षीय व्यक्तीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसलळी आहे. या प्रकरणातील आरोप भीमराव कांबळे याला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याला कठोर शासन करावे, अशी भावना व्यक्त केली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती येथे एका 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनं आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पर्वती या भागात ही घटना घडली आहे. येथे 9 वर्षीय मुलीवर काही लोकांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु संशय आल्याने त्या भागातील लोकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. हा प्रकार समोर आल्यानंतर तेथील नागरिक चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळाले. घटना समोर येताच लोकांनी तेथे गर्दी केली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. परंतु संतप्त नागरिक आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते. तेथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.

पोलिसांनीही तत्परता दाखवत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे नसरापूरच्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे हा प्रकार समोर आल्याने पुण्यात नेमकं काय चाललंय, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

नसरापूर प्रकरणी कडक कारवाई होणार

दुसरीकडे नसरापूर प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून लवकरच आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल. त्यानंतर घटला चालू होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.