सोयगाव: सोयगाव शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई उग्र रूप घेत असून, प्रत्यक्षात ३८ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना कागदावर मात्र तीन गावांत चार विहिरी अधिग्रहित झाल्याचे चित्र आहे.
तीन गावांत विहीर अधिग्रहणाचे अद्याप तहसील प्रशासनाने आदेश काढले नसून, सावरखेडा-लेनापूर गावांचा दोन टँकरचा प्रस्ताव स्थळ पाहणीअभावी धूळ खात तहसील कार्यालयात पडून आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोयगाव तालुक्यातील ३८ गावांच्या घशाला कोरड पडली आहे.
सोयगाव तालुक्यात ३८ गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र, तालुका प्रशासनाच्या कागदोपत्री केवळ सात गावांत पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सात विहिरींच्या अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झालेले असल्याचे दाखविण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhajinagar: चार कोटींचे प्रस्ताव पाच मिनिटांत मंजूर;कोविड लसीकरणातील साहित्य खरेदीवर एमआयएमचा आक्षेपत्यापैकी सावरखेडा आणि लेनापूर या गावांतील टॅंकरचे प्रस्ताव क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्थळ पाहणीअभावी धूळ खात पडलेले आहेत. सावळदबारा येथे दोन विहिरी, टिटवी-१, घाणेगाव तांडा-१ अशा चार विहिरींचे अधिग्रहणाचे प्रस्ताव मंगळवारी (ता. पाच) मंजूर करण्यात आले, तर निमखेडी, वरखेडी व ठाणा येथील प्रस्ताव अद्यापही मंजूर नाहीत.
"तालुक्यातील तीन गावांना चार विहिरींच्या अधिग्रहणाचे आदेश मंगळवारी (ता. पाच) देण्यात आले. संबंधित गावांच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तातडीने विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. टॅंकरसाठी दोन गावांचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी तहसीलकडे पाठविण्यात आले आहेत."
- संतोष भालेराव, प्रभारी गटविकास अधिकारी, सोयगाव
Premium|7/12 Records: ७/12 वर नाव असूनही जमीन तुमची नाही? डिजिटल रेकॉर्ड, बनावट फेरफार आणि कायदेशीर फसवणुक या गोष्टी नेमक्या कशा होतात..? समितीला स्थळ पाहणीसाठी मिळेना वेळटँकर मंजुरीचे अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आले असून, त्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा आणि भूवैज्ञानिकांचा समावेश असून, या समितीला मात्र सावरखेडा आणि लेनापूर या गावांना स्थळ पाहणीसाठी अद्याप वेळ नाही. त्यामुळे मंजुरीअभावी या गावातील टँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.