PM मोदी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनलमध्ये जाणार, 10 मे रोजी करणार ध्यान मंदिरांचं उद्धघाटन
Tv9 Marathi May 06, 2026 02:45 PM

Art Of Living International Meditation Temple: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑर्ट ऑफ इंटरनॅशनल सेंटरला 10 मे रोजी भेट देतील. या केंद्राला 45 वर्षे पूर्ण झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर याचवेळी श्री श्री रविशंकर यांचा 70 वा वाढदिवस आहे. तर या आध्यात्मिक केंद्रातील अनेक सेवांचे उद्धघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. या इंटरनॅशनल केंद्रातील ध्यान मंदिराचे उद्धघाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, या दौऱ्यात मोदी अनेक सेवा आणि आध्यात्मिक केंद्राला भेट देतील. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक गैर लाभ घेणारी शैक्षणिक आणि मानवीय संस्था आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी 1981 मध्ये केली होती. ही संस्था सध्या 182 देशांमध्ये काम करते. ही संस्था देशातील अनेक ठिकाणी शिबिरं भरवते. मानव उन्नती आणि विकास, तसेच आध्यात्मिक अनुभवासाठी संस्था अनेक उपक्रम राबवते.

मार्च महिन्यात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता दौरा

या मार्च महिन्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषिकेश येथील शिशम या गर्द वनराईतील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमधील श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. त्यांनी आध्यात्मिक गुरूचा आशीर्वाद घेतला. त्यांनी सामाजिक सद्भावना आणि आध्यात्मिक जागरुकतेशीसंबंधी विविध विषयावर सखोल चर्चा केली. गुरदेवांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन जगभरात शांती, योग आणि मानवीय गुणांना वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचा गौरवोद्गार मुख्यमंत्री धामी यांनी केला. आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा पसरल्याचा दावा त्यांनी केला.

संत आणि आध्यात्मिक गुरुंचे मार्गदर्शन

तर श्री श्री रविशंकर यांनी उत्तराखंड सरकारचे कौतुक केले. उत्तराखंडमधील आध्यात्मिक वारसा आणि नैसर्गिक सुंदरता ही एक खास ओळख असल्याचे गुरुदेव म्हणाले. ही आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची अत्यंत गरज असल्याचे श्री श्री रविशंकर म्हणाले. त्यांनी राज्याच्या विकासासाठी संतांचे आणि आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असल्यावर भर दिला. तर श्री श्री रविशंकर हे सातत्याने लोकांना योग्यमार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे धामी म्हणाले. आर्ट ऑफ लिव्हिंग हे समाजात चेतना आणि राष्ट्र विचार तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहो अशी सदिच्छा उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी दिल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.