भाई कोतवाल यांचा पुतळा बसवा
esakal May 06, 2026 06:45 PM

पिंपरी, ता. ६ ः ‘‘फुगेवाडी-दापोडी येथील स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल चौकात हुतात्मा भाई कोतवाल यांचा अर्धपुतळा बसवून चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे’’, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह इतर नगरसेवकांना देण्यात आले.
याप्रसंगी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक मगर, उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव, संपत ताटे, कोषाध्यक्ष तानाजी वाळुंजकर, राज्य कार्यकारिणी सदस्य अंकुश जाधव, जिल्हा सरचिटणीस तेजस पंडित आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.