पिंपरी, ता.६ ः ‘‘राज्य सरकारच्या निर्णयानुसार उन्हाळ्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत कामगारांना सक्तीची विश्रांती (सुट्टी) देणे आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ती कडक करावी. कामगारांना ‘ओआरएस’ पावडर देण्यात यावी,’’ अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रतर्फे अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपआयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले. कामगार अधिकारी एस.आर.धोत्रे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, सखाराम केदार, लाला राठोड उपस्थित होते.