Kishori Pednekar : डोक्याचा भाग आहे का ? तेव्हा त्यांना मी बघेनच महापौर रितू तावडे यांना किशोरी पेडणेकर यांचा इशारा
Tv9 Marathi May 06, 2026 07:45 PM

“मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डिलिव्हरीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. यामागे संशयास्पद घडामोडी असल्याचा संशय आहे. कोविडनंतरही सेवा सुधारली नाही. आवश्यक डॉक्टरांची कमतरता असल्याचा मुद्दा गंभीर आहे” असं मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या. रात्री डिलिव्हरीसाठी रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. ‘मीनाताई ठाकरे’ या नावामुळे राजकीय हेतूने दुर्लक्ष होतंय का ? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

“महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी; राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे ? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. “आनंदोत्सव साजरे करण्यात महापौर व्यस्त आहेत. त्यांना डोक्याचा भाग आहे का ? स्वतःच्या महापौर कार्यकाळात 138 पुरस्कार मला मिळाले. रितू तावडे अडीच वर्षानंतर जेव्हा पदामुक्त होतील तेव्हा माझ्याच बाजूला बसतील तेव्हा त्यांना मी बघेनच” असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.

‘कोण कुठे जाईल त्याला थांबवता येणार नाही’

“विरोधकांनी सभागृहाची कार्यपद्धती आणि शिस्त शिकावी. कोरम पूर्ण करावा. कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार. मुंबईतील मूळ रहिवासी म्हणून कोळी समाजाचा सन्मान राखावाच लागेल. ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात लोकप्रतिनिधींवर आर्थिक दबाव टाकला जातोय. ⁠कोण कुठे जाईल त्याला थांबवता येणार नाही” असं त्या म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना काम करू दिले जात नसल्याची टीका त्यांनी केली.

त्या स्वत: महापौर होत्या

किशोरी पेडणेकर या मुंबई महानगर पालिकेतील आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेच कामकाज त्यांनी पाहिलं आहे. त्या स्वत: महापौर होत्या. आता विरोधी पक्ष नेता म्हणून ते सताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एक संधी सोडत नाहीत. किशोरी पेडणेकर यांनी यंदाच्या पालिका निवडणुकीतही लोअर परेल मतदारसंघातून विजय मिळवला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.