७०व्या वर्षी नेत्याचं २० वर्षीय तरुणीशी चौथं लग्न, दुसऱ्या पत्नीची पोलिसात धाव; ११ अपत्यांचा बाप, मुलं न झाल्यानं तिसरीला घटस्फोट
esakal May 06, 2026 11:45 PM

समाजवादी पार्टीचा ७० वर्षीय नेता आणि माजी नगरसेवकाने २० वर्षीय तरुणीसोबत चौथं लग्न केलंय. या लग्नानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीने पोलिसात धाव घेत छळ आणि फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. कैला भट्टा इथले नगरसेवक हाजी खलील यांच्यावर दुसरी पत्नी नाजरीने आरोप केला की खलील यांनी मेहरमध्ये दिलेल्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय. हाजी खलील आणि त्यांच्या पत्नीमधला हा वाद १९९१ मध्ये आधीचं लग्न लपवण्याचा, आधीच्या पत्नींपासून झालेल्या ११ अपत्यांशी संबंधित कौटुंबिक वादातून निर्माण झाला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

खलील यांची दुसरी पत्नी नाजरीनने म्हटलं की, आमचं लग्न १९९१ मध्ये झालं होतं. त्यावेळी खलील यांनी आधीच ते विवाहित असल्याचं आणि पहिल्या पत्नीपासून ८ अपत्ये असल्याचं लपवलं होतं. नाजरीन यांनाही खलील यांच्यापासून ३ अपत्ये आहेत. नाजरीन यांच्यानंतर खलील यांनी २०१०मध्ये तिसरं लग्न केलं होतं. मात्र अपत्य न झाल्यानं त्यांनी तिसऱ्या पत्नीला तलाक दिला होता. आता चौथ्यांदा ते बोहल्यावर चढले असून २० वर्षीय तरुणीशी लग्न केल्यानं नवा वाद निर्माण झालाय.

Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला

नाजरीन यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार दिलीय. त्यात म्हटलं की, जी मालमत्ता खलील यांच्या ताब्यात आहे ती त्यांना मेहर म्हणून मिळाली होत. आता हाजी खलील आणि त्यांची पत्नी यास्मिन यांचा डोळा मालमत्तेवर आहे. दोघे मिळून मालमत्ता नावावर करण्याचा कट रचत आहेत असा आरोप नाजरीन यांनी केलाय. मालमत्तेच्या हस्तांतरणाला विरोध करताच मुलांसह बाहेर काढल्याचंही नाजरीन यांनी म्हटलंय.

हालील खलील हे १९९५ आणि २००० मध्ये इस्लामनगर वॉर्डमधून नगरसेवक होते. त्यांच्यावर नगरपालिकेच्या कोट्यवधि रुपयांच्या जमिनीवर अनधिकृतपणे ताबा मिळवल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता तक्रार मिळाली असून याची पूर्ण चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.