आठ वर्षांपूर्वीच 'सरकार' चित्रपटातून 'सरकार'चा पाया? त्या नंबर प्लेटने सुद्धा लक्ष वेधलं! स्वप्नपूर्ती होताच समर्थक विजयच्या शपथविधीसाठी मैदानात पोहोचले, पण..
जयदीप मेढे May 07, 2026 05:13 PM

Thalapathy Vijay: तमिळनाडूत डीएमके आणि एडीएमके यांच्यामध्येच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, अवघ्या दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या मेगास्टार थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 234 सदस्य असलेल्या विधानसभेमध्ये तब्बल 108 आमदार निवडून आणत चमत्कार घडवला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष टीव्हीके ठरला आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यामध्ये राज्यपालांनी या खोडा घालण्यास सुरुवात केली आहे. बहुमत विधानसभेत सिद्ध होत असताना राज्यपालांनी मात्र बहुमताचा आकडा 118 आहे तर 118 आमदारांच्या सह्या घेऊन या अशा पद्धतीची विचित्र अट टाकत विजयची गोची केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून विजय यांचा शपथविधी लांबणीवर पडत आहे.

मात्र, विजय यांच्या मनामध्ये तमिळनाडूचे नेतृत्व करायचं ही भावना अवघ्या काही वर्षांपासून होती हे आता स्पष्ट होत आहे. 2018 मध्ये झालेल्या त्याच्या 'सरकार' चित्रपटाने ही बाब आता अधोरेखित केली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सरकार चित्रपटातील नंबर प्लेटने सुद्धा लक्ष वेधलं आहे. 

तो सीन पुन्हा चर्चेत 

या सिनेमात विजयच्या गाडीच्या नंबर प्लेटवर TN 07 CM 2026 असा नंबर पहायला मिळतो. सिनेमा प्रदर्शित झालेला त्यावेळी या नंबरप्लेटकडे सहसा कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. परंतु आता राजकीय विजयामुळे तो सीन पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक चाहत्यांनी याला भविष्यवाणी म्हटलं, तर अनेकांनी याला केवळ एक योगायोग असल्याचं म्हटलं. सध्या त्या सीनची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. 

शपथ घेताना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता

त्यामुळे विजयला आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आहे. त्यामुळे शपथविधी होईल या आशेने अनेक कार्यकर्ते चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर पोहोचले होते. मात्र शपथविधी रद्द झाल्याची माहिती मिळताच अनेकांची निराशा झाली. काहींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. त्यामुळे विजय यांचा शपथवादी कधी होतो याचीच उत्सुकता तमिळनाडूसह देशाच्या राजकारणामध्ये आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्षांचे दमन करण्याचं काम राज्यपालांकडून पुन्हा एकदा सुरू झालं आहे. राज्यपाल विरुद्ध विजय या वादामध्ये आता विजय कोणता निर्णय घेतात याकडे सुद्धा लक्ष असेल. दुसरीकडे एआयडीएमके आमदार फुटीच्या अंबरठ्यावरती आहेत. काही आमदार विजयला समर्थन देण्याच्या बाजूने आहेत, तर काही विरोधात आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.