'अपमान, खोटी वचनं आणि मानसिक त्रास' विजय थलपतीवर पत्नीनं केले गंभीर आरोप, म्हणाली...
esakal May 07, 2026 05:45 PM

THALAPATHY VIJAY-TRISHA KRISHNAN RELATIONSHIP RUMOURS: दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय हा सध्या चर्चेत आहे. ४ मे रोजी पार पडलेल्या निवडणुकीतील निकालात त्याच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगत असताना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सुद्धा बोललं जातय. तो अभिनेत्री त्रीशा कृष्णन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातय.

त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जाताय. ज्यादिवशी निकाल होता त्यादिवशी विजयच्या घरी त्रीशा गेल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरबाबत पुन्हा चर्चा रंगल्या. काही दिवसापूर्वी विजयची पत्नी संगीतानं घटस्फोटाची याचिका देखील दाखल केली होती. याचिकेत विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही पत्नीने केला होता.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार थलपती विजय सध्या पत्नीपासून वेगळा राहतोय. त्यांचा २७ वर्षांचा संसार आता मोडण्याच्या टप्प्यावर आलाय. यावेळी संगिता यांनी याचिकेत सासरच्या घरात राहण्याचा अधिकार मागितला आहे. स्वत:ला घराबाहेर राहवं लागू नये यासाठी न्यायालयात तात्पुरता दिलासा मागितलाय. यावेळी याचिकेत त्यांनी विजयवर अनेक गंभीर आरोप केलेत.

View this post on Instagram