साईबाबा संस्थानने मोठा निर्णय! राज्यातील 'या' विद्यार्थ्यांना मिळणार मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा
नितीन ओझा, एबीपी माझा May 07, 2026 07:13 PM

Sai Baba Sansthan Shirdi News :  शिर्डीच्या साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी साईबाबा संस्थान पुढे सरसावले आहे. आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाती विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, 10 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे.

. भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सुविधा देणार

आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची असलेली CET ची फी देखील साईबाबा संस्थान भरणार आहे. भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सुविधा सुरू करण्याची तयारी संस्थानने केली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना मठा दिलासा मिळणार आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.