मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर
GH News May 07, 2026 08:12 PM

मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे हे लग्नासाठी जात असताना शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जात होते, त्याचदरम्यान त्यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जुहू एयरपोर्टवर इमर्जेंसि लॅंडिंग करण्यात आलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सवरून लग्नासाठी मुरबाडला निघाले होते. त्याचवेळेला कल्याणजवळ ही घटना घडली आहे. त्यानंतर जुहू एअरपोर्टवर या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या सोसाट्याचा वारा सुरू आहे. याचा फटका हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्याचा पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचं विमान या वादळात अडकलं, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. ते लग्नासाठी मुरबाडला जात असताना ही घटना घडली आहे. शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणला पोहोचताच वादळात अडकलं. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 10 ते 15 मिनिट हे हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं होतं. पायलटनं दाखवल्यामुळे प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.