राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक
सदाशिव लाड, एबीपी माझा May 07, 2026 09:13 PM

Raju Shetti  News : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुक राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. गेले अडीच महिने सातत्याने संघर्ष करत आहे. मात्र सरकारकडून म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुजबी चर्चा झाली. पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली, अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली.

15 मे ला गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा

दरम्यान, शेतकऱ्यांना जाहीर केलेली नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. सरकारने नुकसान भरपाई देताना जे निकष लावले त्यातून 70 ते 75 कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळणार आहेत. हे कोकणातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. त्यामुळे येत्या 15 मे ला गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढत त्यांना जाब विचारणार आहोत. आम्हाला गृहीत धरले तर वाईट होईल असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.