मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर
Tv9 Marathi May 07, 2026 09:45 PM

मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे हे लग्नासाठी जात असताना शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जात होते, त्याचदरम्यान त्यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जुहू एयरपोर्टवर इमर्जेंसि लॅंडिंग करण्यात आलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सवरून लग्नासाठी मुरबाडला निघाले होते. त्याचवेळेला कल्याणजवळ ही घटना घडली आहे. त्यानंतर जुहू एअरपोर्टवर या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या सोसाट्याचा वारा सुरू आहे. याचा फटका हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्याचा पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचं विमान या वादळात अडकलं, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. ते लग्नासाठी मुरबाडला जात असताना ही घटना घडली आहे. शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणला पोहोचताच वादळात अडकलं. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 10 ते 15 मिनिट हे हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं होतं. पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये सोसाट्याचा वारा

दरम्यान कल्याण डोंबिवलीचं वातावरण अचानक बदलल्याचं पाहयला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरात सोसाट्याचा वारा सुरू आहे.  वाऱ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  याच वादळाचा फटका हा एकनाथ शिंदे यांना देखील बसला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र त्यानंतर या हेलिकॉप्टरचं जुहू एअरपोर्टवर  इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

हेलिकॉप्टरमध्ये कोण -कोण होतं? 

या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर आणि सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी होते. हेलिकॉप्टरचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर हे सर्वजण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.