Cricket : बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर, वैभव सूर्यवंशी खेळणार?
GH News May 07, 2026 09:11 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आता दिवसेंदिवस प्लेऑफमधील 4 जागांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. एकूण 10 संघांमध्ये या 4 जागांसाठी चढाओढ आहे. त्यामुळे कोणते 4 संघ प्लेऑफचं तिकीट मिळवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या प्लेऑफमधील 4 सामन्यांचं बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केलं. आयपीएलनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आयपीएलनंतर आयर्लंड आणि झिंबाब्वे दौरा करणार आहे. टीम इंडिया दोन्ही संघांविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता बीसीसीआयने 6 मे रोजी इंडिया ए टीमचं ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया ए टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.  इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र वैभव सूर्यवंशी याला या मालिकेसाठी संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किती सामने? कधी आणि कुठे?

इंडिया ए टीम ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध 2 मल्टी डे सामने खेळणार आहे. मल्टी डे मॅच 4 दिवसीय असणार आहे. पहिला सामना हा 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तसेच मल्टी डे मॅचनंतर उभयसंघात 3 एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. हे सर्व सामने एकाच ठिकाणी पुद्देचरी इथे होणार आहेत.

ऑस्ट्रेलिया ए टीमचं भारत दौऱ्याचं वेळापत्रक

वनडे सीरिज कधीपासून?

मल्टी डे सीरिजनंतर इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात  6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये वैभव सूर्यवंशी याला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वैभवने गेल्या वर्षी एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत इंडिया ए साठी जबरदस्त कामगिरी केली होती. वैभवने स्पर्धेत 4 सामन्यांत 239 धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभवला ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध मल्टी डेसह वनडे सीरिजसाठी संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.