कलिंगडमुळे नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळेच मृत्यू, पायधुनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी 11 दिवसांनी कारण समोर
सचिन गाड May 07, 2026 08:13 PM

Watermelon Death Case Mumbai News : मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) समोर आली होती. या प्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चौघांच्याही शरीरात सापडलं उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडलं झिंक फॉस्फाईट सापडले आहे.  
11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागला आहे.  

26  तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ले होते. कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. 26 तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (44) त्यांची पत्नी नसरीन (35) आयेशा (16) आणि झैनब (13) यांचा अचानक मृत्यू झाला होता. 

चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळलं

मुंबईतील पायधुणीतील चार जणांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्या चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळलं आहे. याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. झिंक फॉस्फाईट त्या चौघांच्या शरिरात गेल्यानं त्यांना उलट्या झाल्या, या नंतर ते फॅमिली डॉक्टरकडे गेले होते.  त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. उलट्या झाल्यानं विष बाहेर आल्यानं चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट होतं. उंदीर मारण्याच्या औषधानं त्यांचा मृत्यू झाला आहे. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारलंय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.