विरार : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक होऊन ३ महिने झाले तरी त्याठिकाणच्या प्रभागसमिती सभापती,परिवहन समिती सभापती, आरोग्य समिती आणि महिला आणि बालकल्याण समिती सभापतींची निवडणूक रखडली होती.उद्या (8 मे ) ला या दोन्ही समितीची निवडणूक होत असून,याठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि भाजप मध्ये थेट लढत होत आहे.या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुरानी जाखड यांची निवड करण्यात आली आहे.
काल या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली.यामध्ये आरोग्य समितीसाठी भुउजन विकास आघाडीकडूम निलेश देशमुख यांनी तर भाजप कडून डॉ.योगिता करंजकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.उपसभापतीपदासाठी बहुजन कडून निषाद चोरगे आणि भाजपकडून जितेंद्र राऊळ यांनी अर्ज दाखल केले आहेत.
महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपकडून सानवी यंदे तर बहुजन विकास आघाडीकडून बिना मायकल फुरट्याडो यांनी अर्ज दाखल केले आहेत.उपसभापतीपदासाठी भाजपकडून मीना निकम व बहुजन विकास आघाडीकडून सुवर्णा पाटील यांनी आपले अर्ज पालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांच्याकडे सादर केले आहेत.