फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्रामध्ये ज्या प्रमाणे तुमचं घर कोणत्या दिशेला असावं? घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या वस्तू नसाव्यात? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे फेंग शुईमध्ये देखील घराच्या रचनेपासून ते घरात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या वस्तू असू नयेत? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. फेंग शुईमध्ये काही प्राण्यांना हे खूप शुभ माण्यात आलं आहे. जसं की हत्ती, कासव, तीन पायांचा बेडूक या सारखे प्राणी. जर तुम्ही या प्राण्यांच्या मूर्ती तुमच्या घरात ठेवल्या तर त्यामुळे घरात पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. घरातील दोष नाहिसे होतात आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या मार्गी लागतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र या मूर्ती घरात ठेवताना त्या आपण कोणत्या दिशेला ठेवत आहोत, हे देखील महत्त्वाचं आहे. जर तुम्ही या मूर्ती चुकीच्या दिशेला ठेवल्या तर त्याचा परिणाम उलटा देखील होऊ शकतो, असं देखील फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण कासवाच्या मूर्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
घरात कासवाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी?
फेंग शुईनुसार घरात कासवाची मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. जर घरात कासवाची मूर्ती असेल तर त्याचा चांगला प्रभाव कुटुंब प्रमुख तसेच घरातील इतर सदस्यांवर पडतो. कासवाला स्थिरता आणि शांतीचं प्रतिक देखील मानलं गेलं आहे. जर तुमच्या घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होत असतील, घर आर्थिक दृष्या अस्थिर बनलं असेल तर अशावेळी घरात कासवाची मूर्ती ठेवावी असा सल्ला फेंग शुई शास्त्रामध्ये देण्यात आला आहे. जर तुमच्या घरात कासवाची मूर्ती असेल तर त्यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. तसेच घर शांत राहतं, घरात भांडणाचे प्रसंग निर्माण होत नाहीत.
मात्र घरात कासवाची मूर्ती ठेवत असताना नेहमी दिशा लक्षात घ्यावी कासवाची मूर्ती ही नेहमी उत्तर दिशेलाच ठेवावी. म्हणजे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावं असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. उत्तर दिशा ही करियर, नोकरी आणि आर्थिक प्रगती यांचं प्रतिक मानली जाते, त्यामुळे या दिशेला जर तुम्ही तुमच्या घरात कासवाची मूर्ती ठेवली तर त्यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)