डॉ. मालविका तांबे
पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये जास्त महत्त्व कोणाचं आहे, तर ते निश्चितच स्त्रीला दिलं जातं. कारण निसर्गाने तिला आई होण्याची, पुढच्या पिढीला जन्म देण्याची जी सृजनात्मक क्षमता दिलेली आहे, ही क्षमता एक गोड जबाबदारी म्हणून बहुतांशी स्त्रिया स्वीकारत असतात. ज्याप्रमाणे स्त्रीला आई होण्याचा आनंद असतो, अभिमान असतो; तसंच मुलांनासुद्धा त्यांची आई एक छत्रछाया, एक आधार म्हणून अगदी लहानपणापासून वाटत असते।
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया॥
अर्थात आईसारखं आधार देणारं, संरक्षण करणारं कोणीही नसतं। आईसारखं आश्रय देणारं कोणी नाही आणि तसंच आईसारखं प्रेम करणारे व प्रेम असणारेसुद्धा दुसरं कोणीही आपल्या आयुष्यात नाही।
मातृत्व
हे वरदान स्त्रीला मिळाल्यामुळे निसर्गाने आपसूकच तिला एक वेगळीच सहनशक्ती दिलेली आहे. सृजनात्मकता दिलेली आहे. एवढेच नव्हे तर कुठल्याही स्त्रीची त्याग करण्याची क्षमता, कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची क्षमता व पालनपोषण करण्याची एक वेगळीच मानसिकता तिला दिलेली आहे. एक आई बाळाला जन्म दिल्यानंतर केवळ आई म्हणूनच नव्हे तर त्याच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावत असते. बऱ्याचदा असं गमतीत म्हटलंसुद्धा जातं की बाळाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात त्याच्या विकासात आईचं योगदान शंभराला असलं तर वडिलांचं कदाचित दोन आकड्यापर्यंतसुद्धा पोहोचणार नाही. जन्म घालणं ही काही सोपी प्रक्रिया नव्हे. संपूर्ण नऊ महिने आई गर्भाला पोटात ठेवून आपल्या रक्तमांसादीने पोषण तर करतच असते, पण त्याचबरोबरीने तिच्या शरीरातसुद्धा अनेक बदल होत असतात. हे बदल प्रत्येक वेळेला सोपे असतातच असं नव्हे. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की एका गर्भवती स्त्रीची काळजी ज्या प्रकारे आपण तेलाचं काठोकाठ भरलेलं पात्र हलवताना काळजी घेतो तशी घेतली गेली पाहिजे. अर्थातच एकही झालेली चूक ही कदाचित त्या स्त्रीकरता संपूर्ण आयुष्याकरता त्रासदायक ठरू शकेल.
सध्याच्या काळात या मातृत्वाला अजून एक त्रासदायक जोड सुरू झालेली आहे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रोसीजर्सची। सिझेरियन सेक्शन करत असताना दिला जाणारा स्पायनल एनेस्थेशिया, याच्याने नंतर बऱ्याच काळ कंबरदुखीसारखे त्रास. त्याच्यामुळे गर्भाशयला होणारी मोठी जखम पण वाता संबंधित त्रासाला कारणीभूत होते. नशिबाने नैसर्गिक प्रसूती झालीच तर त्याच्यामध्ये गरज आहे का नाही आहे याचा कुठेही विचार न करता एपिझियोटॉमी करणे. काही कारणाने दिवस नसतील राहत तर IUI, IVF सारखे प्रोसीजर्स हे स्त्रियांवरतीच केले जातात. मातृत्व मिळवण्याकरता स्त्री ह्या कुठल्याही प्रक्रियांना नाकारत नाही. ती हसतमुखाने आशावादी राहून या सगळ्या प्रक्रियांच्या सामोरे जाते.
आयुर्वेदाप्रमाणे बाळाची प्रकृती ही आईच्या प्रकृतीवरती खूप प्रमाणात अवलंबून असते. मुळातल्या प्रकृतीबरोबरच आईचं खानपान, वागणूक, मानसिकता, भावनिकता व तसेच तिचा आध्यात्मिक दृष्टिकोन हे सगळंच बाळाच्या स्वास्थ्याला प्रभावित करत असते. त्यामुळेच आयुर्वेदात मासानुमासिक औषध व रसायनांबरोबरच संगीत, योगासनं, चांगली पुस्तक वाचणं, सत्संग, संगीत, ध्यानधारणा इत्यादी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. प्रकृतीवरती संपूर्णपणे काम करण्याच्या दृष्टीने दिवस राहण्यापूर्वी शास्त्रोक्तरीत्या पंचकर्म करून शरीरशुद्धी पण करायला सांगितलेली आहे. नऊ महिने वेगवेगळ्या प्रकारचे आहार हे बाळाकरताच नव्हे तर तिच्या स्वतःच्याही ओजसकरता, बाळाकरता पुढे लागणाऱ्या स्तन्याकरता खूप विचारपूर्वक आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. कुठल्याही शास्त्रामध्ये इतक्या खोलवर विचार अजूनपर्यंत झालेला नाही. आयुर्वेदामध्ये आईला आदिवैद्य अर्थात बाळाकरता सर्वप्रथम चिकित्सा वापरणारा वैद्य अशी तिची ओळख असते. बाळाच्या पोटात दुखलं तर काय करायचं? बाळ रडायला लागलं तर कसं थांबवायचं? त्याला सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास व्हायला लागला तर कुठली घरगुती औषधं करावी? डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला कशी मदत करावी? त्याला कसं शांत करावं हे सगळं मातृत्व आपसूक शिकवतं. आयुर्वेदामध्ये या मातृत्वाला मदत करण्याकरता बाळाला सुरुवातीपासूनच संतुलन बालामृत सारखे सुवर्णप्राशन संतुलन बालगुटी सारख वनस्पतींचा एक संच की जो एकूणच बाळाची प्रतिकारशक्ती, पचन, संपूर्ण विकास या सगळ्यांमध्ये तिला मदत करायला सक्षम असतो.
प्रसूती झाल्यानंतर प्रसूता स्त्रीची काळजी कशी घ्यावी याच्याकरता आयुर्वेदामध्ये सुतिका परिचर्येचा उल्लेख केलेला आहे. तिच्या शरीरात झालेले सगळे शारीरिक व होरमोनल बदल परत पूर्ववत व्हायला मदत मिळावी याच्याकरता कशा प्रकारे अभ्यंग करावं, धूप करावा, आहाराची काळजी कशी घ्यावी या सगळ्याचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे. लॅक्टोसॅन, शतावरी कल्पसारख्या वनस्पतीक औषध हे स्तन्य व्यवस्थित निर्मित व्हायला शक्ति धूप व फेमिसॅन तेलाचा योनी धूप व योनी पिचू केल्याने तिचा गर्भाशय पूर्ववत व्हायला मदत मिळते. कुंडलिनी तेलासारखं तेल पाठीला नियमित लावल्याने तिच्या पाठीच्या कण्यावरती आलेला ताण कमी होऊन तिची कंबरेची ताकद पूर्ववत व्हायला मदत मिळते. असे कित्येक उपाय आपल्याला आयुर्वेदामध्ये सापडतात.
आजचं बरंचसं संशोधन आपल्याला सांगतं आहे की आईची मानसिकता, आईची वागणूक, आईचं खानपान हे बाळाच्या जेनेटिक एक्सप्रेशन अर्थात अर्थात जनुकांवरती परिणाम करू शकतंय. आणि हे सगळं जर का व्यवस्थित सांभाळलं गेलं तर येणाऱ्या बाळाचं स्वास्थ्य आपल्याला सुधरवायला मदत करता येऊ शकते. आयुर्वेदासारख्या शास्त्राने किती हजारो वर्षांपूर्वी याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत. एकूणच पाहिलं तर मातृत्व मिळण्याकरता स्त्री बरेचसे कष्ट घेते.
या कष्टाचं चीज खरं करायचं असलं तर नुसता मदर्स डे ला एक केक आणून कापण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने तिची काळजी घेतली तर खरा तिचा मातृत्व दिनाचा गौरव होऊ शकेल. स्त्रियांच्या आहारामध्ये दूध, फळं, फळांचा रस, साजूक तूप, अक्रोड, काजू, चांगल्या प्रतीच्या भाज्या, धान्य तसेच गर्भाशयाचे आरोग्य टिकवून राहण्याकरता संतुलन फेमीसॅन सिद्ध तेलासारखा तेलाचा पिचू, शक्ती धुपासारखी आयुर्वेदिक धुरी योनीभागी घेणे, संतुलन सुरू तेलासारखे तेल नियमितपणे स्तनांवरती लावणे, संतुलन अमृत शर्करा युक्त पंचामृत घेणे, धात्री रसायन स्यान रोज मारुसानसारखे रसायन घेणे, त्यांना योगासनाकरता, चालण्याकरता रोज वेळ काढणे, शास्त्रोक्त पंचकर्म करणे, उत्तर बस्ती घेणे या सगळ्याकरता तिला प्रोत्साहित करणे व मदत करणे हे अत्यंत आवश्यक आहे. हा सगळा विचार स्त्रियांकरता कुटुंबातल्या सदस्यांनी केला तर खरा मातृदिन साजरा होऊ शकेल.