Petrol-Diesel Price: अवघ्या 39 पैशांना डिझेल, तर पेट्रोल 2.25 रुपये लिटर, सर्वात महागडे इंधन तर…
Tv9 Marathi May 08, 2026 01:45 PM

Petrol And Diesel Price Today: इराण युद्धामुळे जगभरात इंधनाच्या किंमतीत मोठी उसळी दिसली. भारतातही तेलाच्या किंमती भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर जगातील काही देशात 1 लिटर पेट्रोलची किंमत 2.25 रुपये तर काही भागात हाच दर 394.95 रुपये आहे. म्हणजे जगातील काही भागात पेट्रोलची किंमत भारतापेक्षा 44 पट स्वस्त तर काही भागात चार पट महाग आहे. सर्वात महागडे इंधन कोणत्या देशात मिळते?

सर्वात महागडे इंधन कुठे?

जगात सर्वात महागडे पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या देशात हाँगकाँग नंबर वनवर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत जवळपास 400 रुपये आहे. तर त्यानंतर मलावी या देशाचा क्रमांक लागतो. येथे एक लिटर पेट्रोलचा भाव 364.27 रुपये प्रति लिटर इतका आहे. त्यानंतर इस्त्रायलमध्ये पेट्रोल 269.19 रुपये लिटर इतके आहे. तर डेन्मार्कमध्ये हा भाव 265.74 रुपये इतका आहे. नेदरलँड या देशात एक लिटर पेट्रोलसाठी 260.15 रुपये मोजावे लागतात. तर ग्रीस या देशात हा भाव 231.57 आणि अल्बानियामध्ये 231.49 रुपये लिटर तर स्वित्झर्लंडमध्ये पेट्रोलची किंमत 231.12 रुपये तर सिंगापूरमध्ये 230.02 रुपये लिटर पेट्रोल आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल विकणारे टॉप-10 देश

जगात सर्वात स्वस्त पेट्रोल लिबीया या देशात आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 2.25 रुपये आहे. त्यानंतर इराणचा क्रमांक लागतो. एक लिटर पेट्रोलसाठी इराणमध्ये 3.32 रुपये मोजावे लागतात. त्यानंतर अंगोला या देशात 31.08 रुपये, कुवेतमध्ये 32.41, अल्जेरिया या देशात 33.75 आणि तुर्कमेनिस्तानमध्ये 40.78 रुपये असा भाव आहे. इजिप्तमध्ये पेट्रोलचा भाव 42.78 रुपये आहे. तर नॉर्वेमध्ये हा भाव 54.62 रुपये तर सौदी अरबमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 59.62 रुपये हा भाव आहे .

डिझेल तर अवघे 39 पैसे

व्हेनेझुएला या देशात सर्वात स्वस्त डिझेल मिळते. या देशात अवघ्या 39 पैशांना एक लिटर डिझेल मिळते. त्यानंतर इराणमध्ये 54 पैसे तर लिबिया या देशात हा भाव 2.25 रुपये इतका आहे. अल्जेरियामध्ये एक लिटर डिझेलची किंमत 22.26 रुपये इतकी आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये एक लिटर डिझेलची किंमत 27.19 रुपये तर कुवेतमध्ये हा भाव 35.50 रुपये इतका आहे. इजिप्तमध्ये डिझेलचा भाव 36.36 रुपये, अंगोला देशात 41.44 रुपये लिटर तर सौदी अरबमध्ये एक लिटर डिझेलची किंमत 45.37 रुपये आणि कतार या देशात हा भाव 53.32 रुपये आहे.

हाँगकाँगमध्ये एक लिटरसाठी मोजा 446 रुपये

जगातील सर्वात महागडे डिझेल हे हाँगकाँग या देशात मिळत आहे. या ठिकाणी 446 रुपये लिटर किंमत मोजावी लागते. तर मलावीमध्ये हा भाव 365, सिंगापुर या देशात 310.49 रुपये, डेनमार्क या देशात 273.16 रुपये, स्वित्झर्लंडमध्ये 262.09 रुपये, नेदरलँडमध्ये 257 रुपये लिटर भाव आहे. इस्त्रायलमध्ये एक लिटर डिझेल 255.60 रुपये तर फिनलँडमध्ये हा भाव 255.59 रुपये इतका आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.